‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat EK Aamcha Dada) ही मालिका सध्या नवे वळण घेत आहे. तुळजा सूर्याच्या प्रेमात पडल्याचे मालिकेत पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून तुळजा तिच्या मनातील सूर्याविषयीच्या भावना सांगण्यासाठी धडपड करत असल्याचे पाहायला मिळते. विविध पद्धतीने तिच्या मनात सूर्याविषयी असलेले प्रेम सांगण्यासाठी ती प्रयत्न करताना दिसली. मात्र, प्रत्येक वेळी त्यामध्ये काहीतरी अडथळा आला. शेवटी तिने तिचे प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याला घाटावर बोलावल्याचे पाहायला मिळाले. आता मालिकेत तेजूच्या लग्नाची घाई गडबड चालल्याचे पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर लाखात एक आमचा दादा मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.
तेजूच्या लग्नाची सुपारी फुटली
झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामवर ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सुरुवातीला पाहायला मिळते की सूर्या तेजूला म्हणतो; “डॅडींनी पोरगा बघितलाय तुझ्यासाठी, त्यामुळे जगात भारी असणार.” बघण्याच्या कार्यक्रमात तेजूला बघायला आलेला मुलगा म्हणतो, “हीच ती मुलगी आहे, जी माझं आयुष्य समृद्ध करेल”, यावर डॅडी म्हणतात, “तुम्हा दोघांचे चेहरे बघूनच कळत होतं. तुम्ही एकमेकांना पसंत आहात”, सूर्या म्हणतो, “आमच्या घरातील पहिलंच लग्न आहे, मी कशाचीच कमी पडू देणार नाही.” सूर्याने असे म्हणताच डॅडी,”मग आता लग्नाची सुपारी फोडून घेऊयात”, असे म्हणत सुपारी फोडतात. सगळे निघून गेल्यावर डॅडी त्यांचा मुलगा शत्रूला म्हणतात, तेजूचं लग्न जगासाठी जरी त्या पिंट्याशी होणार असलं तरी खरे नवरदेव आमचे चिरंजीव असणार आहेत.”
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “डॅडींचा प्लॅन होईल का यशस्वी..?”, अशी कॅप्शन दिली आहे.
काही दिवसांपूर्वी मालिकेत पाहायला मिळाले होते की तेजूचे शत्रूबरोबर लग्न लावून देण्यासाठी डॅडींनी त्या मुलाला पैसे देऊन हे नाटक करण्यासाठी बोलावले आहे. ते सूर्या आणि त्याच्या कुटुंबाबरोबर चांगले वागण्याचे नाटक करत आहेत. आता हे सूर्या किंवा तुळाजाच्या लक्षात येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा: “त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
दरम्यान, मालिकेत पुढे काय होणार, डॅडींचा प्लॅन यशस्वी होऊन तेजूचे शत्रूबरोबर लग्न होणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
© IE Online Media Services (P) Ltd