बहीण-भावाच्या नात्यावर आधारित कथा, मालिका, चित्रपट हे प्रेक्षकांच्या सहज जवळचे बनतात. प्रेक्षक भावनिकरीत्या अशा कलाकृतींबरोबर जोडले जातात. झी मराठी वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा'(Lakhat Ek Aamcha Dada) ही मालिका अशा मालिकांपैकी एक आहे. बहीण-भावाच्या नात्यावर आधारित अशी ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसते. सूर्या व तिच्या चार बहि‍णींचे हे नाते प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसते. आता या मालिकेत सूर्याची लहान बहीण भाग्यश्रीवर मोठे संकट आल्याचे समोर आलेल्या प्रोमोममध्ये दिसत आहे.

लाखात एका आमचा दादा या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, भाग्यश्री शाळेतून इतर विद्यार्थ्यांसह प्रोजेक्टच्या स्पर्धेसाठी बाहेरगावी गेली आहे. ती जाताना तिच्या दादाला म्हणजेच सूर्याला सांगते की, स्वेटर घालीन, अरबट-चरबट खाणार नाही आणि एकटी कुठे फिरणार नाही. भाग्याला त्रास देणारा तिचा वर्गातील मुलगा मनातल्या मनात म्हणतो की, आता तर मैदानच मोकळं मिळालंय. पुढे या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, भाग्याच्या ड्रेसला काहीतरी चिकटले आहे, ते पाहिल्यानंतर ती स्वत:शी म्हणते की, आता ड्रेस बदलावा लागेल. असे म्हणून ती बाथरूममध्ये जाते. हे सर्व तिला त्रास देणारा मुलगा बघत असतो. ती बाथरूममध्ये जाताच तो बाहेरून कडी लावतो. तसेच खिडकीत मोबाईल ठेवतो. भाग्या ड्रेस बदलते. त्यानंतर ती म्हणते की कोण आहे? हे ऐकताच तो मुलगा तिथून पळून जातो. भाग्या दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते; मात्र दरवाजा उघडत नाही. ती म्हणते, टीचर दरवाजा उघडा. ती दादा अशी मोठ्याने हाक मारते. दुसरीकडे सूर्या घरात तुळजाबरोबर बसला आहे; मात्र त्याला त्याच्या बहिणीची भाग्याची काळजी वाटत आहे. तुळजा त्याला समजावत म्हणते, “का एवढा टेन्शन घेतोय? बिझी झाली असेल म्हणून फोन केला नसेल”

tula shikvin changalach dhada charulata is the real bhuvneshwari
चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Navri Mile Hitlarla
लवकरच लीला-एजे हटके लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला; त्यांचा नवीन अवतार पाहताच नेटकरी म्हणाले, “आमचे पुष्पा-श्रीवल्ली…”
Vallari Viraj
Video: लीला, शिवा व सरूचा भन्नाट डान्स; वल्लरी विराजने शेअर केला व्हिडीओ, अभिनेत्रीच्या कमेंटने वेधले लक्ष
Navri mile hitlarla
सासरी परत येताच लीलाने केले एजेकडे दुर्लक्ष; तिन्ही सुनांना कामाला लावत म्हणाली, “आमच्यातील नाते…”
Navri Mile Hitlarla
Video: “लीलासाठी स्पेशल…”, एजे-लीलामधील अंतर कमी होणार; मनातल्या गोष्टी ओठांवर येणार? पाहा प्रोमो
An emotional video of a delivery boy having food in the middle of the road while delivering an order went viral on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
Zee Marathi Awards 2024 full Winners List Part 1 and Part 2
Zee Marathi Awards : यंदाची सर्वोत्कृष्ट मालिका ठरली ‘पारू’! तर, लोकप्रिय नायक-नायिका आहेत…; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, भाग्याची आर्त हाक दादापर्यंत पोहोचेल का ? अशी कॅप्शन दिली आहे.

नेटकरी काय म्हणाले?

मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी या प्रोमोवर नाराजी व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “तुमचा किती नीचपणा चालू आहे. आधी त्या तेजूला तो शत्रू कसा त्रास देतोय ते दाखवता आणि आता तर हद्दच केली. एक मुलगा त्या भाग्यश्रीचा व्हिडीओ बनवत आहे. हे सगळे दाखवून तुम्ही प्रेक्षकांना आणि नवीन पिढीला काय शिकवण देत आहात. तुम्ही लोकांनी अतिशय नीचपणाचा कळस गाठला आहे. काही चांगलं दाखवता येत नसेल, तर मालिका बंद करा. असले स्त्रियांवर अत्याचार दाखवून कशाला वाईट वळण लावत आहात? नवीन पिढीला स्त्रियांचा आदर कसा करायचा ते दाखवा. एक मराठी प्रेक्षक म्हणून सल्ला.” तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “त्याच्या या कृत्यासाठी त्या मुलाला शिक्षा झाली पाहिजे”, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, ” ‘दृश्यम’मधील सीन आहे. चित्रपटात कमीत कमी शेवटी शिक्षा दिली होती. मालिकेतसुद्धा शिक्षा होणार असेल, तरच हा सीन दाखवा; नाही तर चुकीचा संदेश दिला जाईल.”

हेही वाचा: दीड वर्षापासून भात, पोळी, साखर काहीच खाल्लं नाही; बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला…

आता मालिकेत पुढे काय होणार, सूर्या तिच्या बहिणीला वाचवू शकणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader