बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि त्याची पत्नी चारू असोपा सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. मागच्या काही काळापासून या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू होत्या. गणेश चतुर्थीच्या वेळी या दोघांनी मुलीसाठी पुन्हा एकत्र येत असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता या दोघांच्या आयुष्यात पुन्हा वाद झाले असून दोघंही घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत पोहोचले आहेत. अशात राजीव सेनची पत्नी चारू असोपने आता पुन्हा एकदा पतीबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत.
चारू असोपाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गरोदर असताना पतीने तिची फसवणूक केल्याचा खुलासा केला आहे. चारू म्हणाली, “बीकानेरमध्ये काळी महिने राहिल्यानंतर मी मुंबईला परतले होते. गरोदर असताना मी सर्वाधिक वेळ मुंबईतच घालवला. त्यावेळी राजीव वांद्रे येथे जिमसाठी म्हणून सकाळी ११ वाजता निघून जायचा आणि रात्री उशीरा ११ वाजता घरी परतायचा. कधी तो ७, ८ किंवा ९ वाजताही यायचा. जेव्हा मी त्याला एकदा विचारलं की एवढा उशीर का होतो. तेव्हा तो मला म्हणाला होता की, मी सर्वात आधी मॅपवर ट्राफिक पाहतो आणि मग एका कॅफेमध्ये कॉफी पितो आणि ट्राफिक कमी होण्याची वाट पाहतो. त्यानंतर मी घरी येण्यासाठी निघतो.’ त्यावेळी मी राजीववर विश्वास ठेवला होता.”
आणखी वाचा-“हे माझे दुसरं लग्न असल्याने…” चारु आसोपाचे सुश्मिता सेनच्या भावावर गंभीर आरोप
चारू पुढे म्हणाली, “राजीव मला अनेकदा सांगायचा की तो कारमध्ये झोपतो किंना मग त्याच्या अन्य काही ना काही कारणं असायची. एकदा तर तो मला काहीच न सांगता दिल्लीला निघून गेला आणि मी त्याचं सामान व्यवस्थित ठेवत होते. त्यावेळी मला त्याच्या बॅगमध्ये असं काही सापडलं ज्यामुळे मला तो माझी फसवणूक करत असल्याची खात्री झाली. मी संपूर्ण कुटुंबाला याची माहिती दिली. जेव्हाही असं काही व्हायचं तेव्हा मी विचार करायचे की मी इथून निघून जाईन. पण माझं त्याच्यावर प्रेम होतं. त्यामुळे सर्व गोष्टी विसरुन पुढे जायचा प्रयत्न करायचे. माझ्या वैवाहिक आयुष्यातली साडेतीन वर्षे आयुष्याची नवी सुरुवात करण्यात गेली.”
आणखी वाचा- अमिताभ बच्चन चाहत्यांना भेटण्याआधी चप्पल का काढतात? कारण आहे खास
दरम्यान गणेश चतुर्थीच्या निममित्ताने चारू असोपा आणि राजीव सेन यांनी त्याच्या वैवाहिक आयुष्याला आणखी एक संधी देण्याचं ठरवलं होतं. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली होती. पण आता राजीवने चारू असोपाची ‘लाय डिटेक्टर टेस्ट’ करण्याची मागणी करत आहे. त्यामुळे तो कधीच बदलू शकत नाही असं चारूचं म्हणणं आहे.