दिवंगत सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिने ८ जून २०२० रोजी मुंबईतील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. दिशाने मुंबईतील मालाड येथील इमारतीच्या १४व्या मजल्यावरून उडी मारली होती. तिला तातडीने बोरिवली येथील रुग्णालयात नेण्यात आलं असता तिला मृत घोषित करण्यात आलं होतं. दिशाने टीव्ही अभिनेता रोहन रायशी साखरपुडा केला होता. दिशाच्या मृत्यूनंतर आता रोहन आयुष्यात पुढे जातोय.
‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, रोहन लवकरच ‘पिया अलबेला’ मालिकेतील सहकलाकार शीन दासशी लग्न करणार आहे. २२ एप्रिलला हे दोघे लग्न करणार आहेत. दिशा सालियन आणि रोहन राय सात वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. आता तिच्या मृत्यूच्या जवळपास दोन वर्षानंतर, रोहन शीन दासशी लग्न करणार आहे. शीन मूळची काश्मीरमधील आहे. त्यामुळे तिथेच हे दोघं लग्न करणार आहेत. विवाहसोहळा तीन दिवस चालणार असून लग्न २२ एप्रिलला होईल. लग्नात त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि इंडस्ट्रीतील काही जवळचे मित्र असतील.
भांडण नाही, मतभेद नाही, तरीही गेली ३४ वर्षे पतीपासून वेगळ्या का राहतात अल्का याज्ञिक? जाणून घ्या
रोहन राय आणि शीन दास यांनी २०१८ च्या ‘पिया अलबेला’ शोमध्ये काम केले आणि नंतर दिशाच्या मृत्यूनंतर पुन्हा त्यांची भेट झाली. शीनने यापूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की दिशा सालियनच्या मृत्यूनंतर रोहनला अशा मीडिया ट्रायल्समधून जाताना पाहून तिला खूप वाईट वाटलं होतं. याच दरम्यान ते दोघं एकमेकांशी बोलू लागले आणि नंतर लग्नाचा निर्णय घेतला. दोघांच्या कुटुंबीयांचाही या लग्नाला होकार होता. आता ते दोघेही एप्रिलमध्ये काश्मीरमध्ये लग्न करतील.