अभिनेत्री सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि टीव्ही अभिनेत्री चारू असोपा यांच्यातील वाद विकोपाला पोहोचले आहे. चारु असोपा आणि राजीव सेन यांनी पुन्हा एकदा वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. २०१९ मध्येते दोघेही लग्नाच्या बंधनात अडकले होते. काही महिन्यांपूर्वी त्या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र त्यांन नात्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला होता. पण आता ते दोघेही घटस्फोट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाही तर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चारूने राजीव सेनवर गंभीर आरोप केले होते. पण आता राजीवने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

राजीव सेन आणि चारू असोपा यांच्यात एकदा- दोनदा नाही तर अनेकवेळा मतभेद झाले आहेत. अलीकडेच चारूने राजीव सेनवर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता आणि राजीवला दुसरी संधी दिल्याचा मला पश्चाताप वाटतोय असं तिने म्हटलं होतं. आता राजीवनेही चारूच्या या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजीव म्हणाला, “म्हणूनच मी तिला ड्रामा क्वीन म्हणतो. पहिली गोष्ट म्हणजे तिला घटस्फोट हवा असेल तर ती मला आणि माझ्या कुटुंबाला थेट फोन करू शकते, पण तिला मीडियाला फोन करण्याची काय गरज होती. तिच्या वागण्यात स्थैर्य नाही.”

Paaru
“तुम्ही पारूला सून म्हणून कधी स्वीकारणार आहात?”, श्रेया बुगडेच्या प्रश्नावर अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणाल्या…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Couple Murdered Daughter In Law
Crime News : विष मिसळलेली ताडी दिली अन् दगडाने ठेचून… मुलाने मनाविरुद्ध लग्न केले, सासू-सासऱ्याने सुनेला संपवले
man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून
Domestic Violence Against Men
Domestic Violence : “ती माझ्या भावाला बेडरूमध्येही येऊ देत नव्हती”, तरुणीचा व्हिडिओ व्हायरल; वहिनीवर केले गंभीर आरोप
government land sale controversy report against female tehsildar news in marathi
बापरे..! महिला तहसीलदाराकडून चक्क शासकीय भूखंडांची विक्री; निलंबन केल्याखेरीज चौकशी अशक्यः एसडीओ डव्हळे
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस यांचा आरोप; “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी बिक्कडने पळवले, वाल्मिक कराड आणि…”
Hansika Motwani sister in law Muskan Nancy James files police complaint
हंसिका मोटवानीसह तिच्या आई अन् भावाविरोधात अभिनेत्री वहिनीची पोलीस तक्रार, तीन वर्षांपूर्वी झालंय लग्न

आणखी वाचा- “हे माझे दुसरं लग्न असल्याने…” चारु आसोपाचे सुश्मिता सेनच्या भावावर गंभीर आरोप

राजीव पुढे म्हणाला, “चारूने माझ्यावर जे काही आरोप लावले आहेत ते खोटे आहेत. मी तिला सोडून अनेक महिने गायब होतो, शिवीगाळ आणि मारहाण केली, असे खोटे आरोप तिने केले आहेत. मी स्वतःहून मीडियाशी कधीच काही बोललो नाही, पण त्यांच्या प्रश्नांची उत्तर देऊन मी माझा बचाव केला आहे. आता मला माझ्या मुलीच्या सुरक्षिततेची काळजी वाटते कारण माझी मुलगी सध्या चारुबरोबर राहत आहे.”

आणखी वाचा-“देशातील सर्व मुस्लीम जेव्हा…” ऋषी सुनकसंबंधीत वादात विवेक अग्निहोत्रींची उडी

दरम्यान चारू असोपा आणि राजीव सेन यांनी २०१९ मध्ये लग्न केलं होतं. पण लग्नानंतर काही काळातच या दोघांमध्ये वाद होऊ लागले. राजीवने यापूर्वी चारूवर पहिलं लग्न लपवल्याचा आरोप केला होता. लग्नापूर्वी तिने पहिल्या लग्नाची कोणतीही माहिती आपल्याला दिली नव्हती असं राजीवने म्हटलं होतं. चारूचं पहिलं लग्न वयाच्या १८ व्या वर्षी झालं होतं आणि दोघांमध्ये वाद होऊ लागल्याने ते वेगळे झाले होते. २०१६ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता.

Story img Loader