अभिनेत्री चारू असोपा आणि सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन यांचा कौटुंबीक वाद सुरूच आहे. सध्या चारू मुलगी झियानासह राजीवपासून वेगळी राहत आहे. अशातच आता राजीवने चारूवर आरोप केले आहेत. राजीवच्या यूट्यूब चॅनेलवरील ताज्या व्लॉगनुसार, त्यालाही चारूपासून घटस्फोट घ्यायचा आहे. तसेच चारूने मुलगी झियानाला त्याच्यापासून हिरावून घेतलं आहे, असंही त्याने म्हटलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
चारूने आपली अपरिपक्वता दाखवत मुलीच्या नावाचा वापर करून युट्यूबवर व्ह्यूज मिळवले, असा दावा राजीवने व्लॉगच्या सुरुवातीला केला. “आपण कंटेंटबद्दल बोलायचं झाल्यास चारूने आमच्या मुलीचा वापर व्ह्यूज मिळवण्यासाठी कंटेट म्हणून केला आहे,” असं राजीव म्हणाला.
‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार घटस्फोटाबद्दल बोलताना राजीव म्हणाला, “मी आणि चारू वेगळे होत आहोत. त्याची कागदपत्रे वगैरे सर्व काही तयार आहे, फक्त त्यावर सही करायची बाकी आहे. आमची तारीखही निघाली आहे. आम्ही आता एकत्र नाही. पण मी प्रयत्न करत आहे की आम्ही दोघे आमच्या मुलीसाठी तिथे असू.”
हेही वाचा – “माझ्या किसिंग सीनचा व्हिडीओ मुलाने पाहिला अन्…” लेकालाच मुर्ख म्हणत ट्विंकल खन्नाचा खुलासा
पुढे राजीव म्हणाला, “चारूने युट्यूबपासून जरा ब्रेक घ्यावा, असं मला वाटत होतं, जेणेकरून ती मुलीवर लक्ष केंद्रित करू शकतील परंतु तिने ते केलं नाही. जेव्हा मी आणि चारू बोलायचो, तेव्हाच मी चारूला सांगितलं होतं की तुझं आमच्या मुलीवर खरोखर प्रेम असेल, तर सहा महिन्यांसाठी युट्यूबवरून ब्रेक घे. तसेच मुलीला सतत कॅमेऱ्यासमोर ठेवण्यापेक्षा तिच्यावर आपण लक्ष केंद्रित करूया. पण तसं झालं नाही. पण तिने युट्यूब सोडलं नाही. प्रत्येकाची स्वतःची विचार करण्याची पद्धत आहे, तिला नसेल युट्यूबपासून ब्रेक घ्यायचा तर त्याला मी काहीच करू शकत नाही,” असं राजीव म्हणाला. त्यानंतर त्याने चारूला त्यांच्या मुलीशिवाय व्लॉग बनवण्याचं आव्हान दिलं. “तू तिच्याशिवाय व्लॉग का बनवत नाहीस? व्लॉगमध्ये तिचा चेहरा कधीतरी एकदाच दाखव आणि तुझे व्ह्यूज वाढतायत की नाही ते आम्ही पाहू. अर्थात ते वाढणार नाहीच,” असा दावाही राजीवने केला.
हेही वाचा – “आरडाओरड करणाऱ्या लोकांमध्ये तो कायम…” रवीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर मराठी लेखकाची तिरकस पोस्ट
चारू व्हिक्टीम आणि वूमन कार्ड खेळत असल्याचाही आरोप राजीवने केला. “आजच्या जगात एखाद्या माणसाची बदनामी करणं खूप सोपं आहे. पण सगळेच पुरुष चुकीचे नसतात. बर्याच पुरुषांना जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जातं,” असं म्हणत चारू खोटे आरोप करत असल्याचं राजीव म्हणाला.