मनोरंजन जगतात रोज कोणत्या ना कोणत्या नात्याच्या तुटण्याची किंवा नव्या अफेअरची चर्चा असतेच. मागच्या काही काळापासून प्रसिद्ध सेलिब्रेटी कपल राजीव सेन आणि चारू आसोपा यांच्या नात्याच्या आणि घटस्फोटाच्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. मध्यंतरीच्या काळात दोघांनीही नात्याला पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ते आता घटस्फोटाच्या निर्णयप्रत पोहोचले आहेत. मागच्या काही दिवसांपासून दोघंही एकमेकांवर सातत्याने गंभीर आरोप करत आहेत. काही दिवसांपूर्वीच चारू असोपाने गरोदर असताना पतीने फसवणूक केल्याचा आरोप राजीव सेनवर केला होता. त्यानंतर आता यावर राजवीनेही उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजीव सेनने चारू असोपाचे सर्व आरोप खोडून काढले आहेत आणि त्याचबरोबर अभिनेत्रीबाबत एक धक्कादायक खुलासाही केला आहे. राजीवच्या म्हणण्यानुसार चारू असोपाचं टीव्ही अभिनेता करण मेहराशी अफेअर होतं. एवढंच नाही तर या नात्याबद्दल राजीवला चारूच्या आईनेच सांगितलं होत असं त्याचं म्हणणं आहे. आपला हा दावा खरा असल्याचं सांगताना राजीवने चारूची आई निलम असोपा यांच्या काही वॉइस नोटही दिल्या आहेत. त्याने सांगितलं की चारूने करणबरोबर रोमँटिक रिल शूट केलं होतं. दोघांच्या या रोमान्सचं सत्य अभिनेत्रीच्या आईनेच राजीवला सांगितलं होतं.

आणखी वाचा-सुश्मिता सेनची भाऊ-वहिनीच्या वादावर पहिली प्रतिक्रिया; चारूला सल्ला देत म्हणाली, “त्याच्याबरोबर…”

मुलाखतीत राजीव सेन म्हणाला, “चारू माझ्यावर चिटिंग केल्याचा आरोप लावत आहे. पण ती स्वतः संशयित आहे. ट्रस्ट इशू मला नाही तर तिला स्वतःलाच आहे. त्यामुळे तिच्यासारख्या व्यक्तीबरोबर मी राहू शकत नाही. चारूचं मानसिक संतुलन ठीक नाही. माझ्या मनात तिच्याबद्दल जो काही आदर होता तो आता संपला आहे. मी तिला कधीच मारहाण केलेली नाही ती खोटं बोलत आहे. ती वूमन कार्ड खेळत आहे. माझ्या संपूर्ण कुटुंबाने तिला एवढं प्रेम दिलं, माझ्यापेक्षा जास्त तिला सपोर्ट केला. पण अखेरीस तिने त्यांच्यावरही असे घाणेरडे आरोप केले. तिने ज्याप्रकारे त्रास दिला आहे त्यासाठी मी तिला कधीच माफ करू शकत नाही.”

आणखी वाचा-“मी गरोदर असताना तो बाहेर…” सुश्मिता सेनच्या भावाबद्दल पत्नीचा धक्कादायक खुलासा

या मुलाखतीदरम्यान राजीवने असेही सांगितले की, “मी चारूला कंटाळलो आहे आणि यापुढे मी तिने लावलेले आरोप सहन करणार नाही. चारूला मदत आणि मार्गदर्शनाची गरज आहे. चारू असोपासह माझी मुलगी राहते त्याबद्दल मला असुरक्षित वाटतं.” दरम्यान या दोघांनी २०१९ मध्ये लग्न केलं होतं. मात्र, लग्नानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. दोघांना एक वर्षाची मुलगी आहे, जिच्यासाठी त्यांनी त्यांचे नाते वाचवण्याचा प्रयत्नही केला होता, मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचं दिसून आलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushmita sen brother rajiv sen shocking reveal about wife charu asopa having affair with karan mehra mrj