‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेचे पहिले पर्व २०१५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आले. या मालिकेमुळे अभिनेता सुव्रत जोशीला एक वेगळी ओळख मिळाली. त्याने ‘दिल दोस्ती’मध्ये ‘सुजय’ हे पात्र साकारले होते. ‘दिल दोस्ती दुनियादारी’च्या घराचा मालक, शिस्तप्रिय आणि सतत मित्रांना मदत करणारा सुजय घराघरांत लोकप्रिय झाला होता. सुव्रतने ‘दिल दोस्ती’ मालिकेसाठी कशी ऑडिशन दिली? याचा भन्नाट किस्सा अभिनेत्याने अलीकडेच एका केक्राफ्ट युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.
हेही वाचा : “…म्हणून आज टिव्ही माध्यमाचा आदर करतो”, स्वानंदी टिकेकरने सांगितला ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेचा अनुभव
सुव्रत जोशी आजच्या घडीला मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे परंतु, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली या मालिकेसाठी त्याने कशी ऑडिशन दिली? याबाबत सांगताना अभिनेता म्हणाला, “‘दिल दोस्ती…’ मालिका करताना मला विनोदचा (दिग्दर्शक) फोन आला होता. मी टिव्ही शो करतोय तू यात काम करणार का? मी तेव्हा फक्त नाटकात काम करायचो त्यामुळे टिव्ही शो करण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. पण, मित्राने ऑडिशन मागितली म्हणून मी… चला आता देऊन बघूया अशा विचारांमध्ये होतो.”
हेही वाचा : “जावईबापू जिंदाबाद”, सासरहून प्रवीण तरडेंना मिळालं अधिकमासाचं वाण, पत्नीने शेअर केला व्हिडीओ
सुव्रत जोशी पुढे म्हणाला, “मी रात्री मित्रांबरोबर गप्पा मारुन, पार्टी वगैरे करून झोपलो होतो. त्यानंतर सकाळी दहा वाजता मला विनोदचा ऑडिशन मागण्यासाठी फोन आला. यानंतर मी विचार करु लागलो…आपण खरंच ऑडिशन दिली पाहिजे की नाही? यासाठी मी विनोदचे खरंच आभार मानतो. रोज टिव्हीसमोर उभे राहायला मिळणार या विचाराने मी तयार झालो.”
“९ वर्ष दिल्लीत असल्याने मला मराठी मालिका लोक किती प्रेमाने बघतात याची खरंच कल्पना नव्हती. मला मराठी मालिका जगताबाबत २००५ पूर्वीच्या गोष्टी माहिती होत्या. विनोद मला म्हणाला, “तू जरा ऑडिशन तरी दे… इतकी लाज नको सोडू” विनोदचे बोलणे ऐकून मी तयारी करुन शहाण्या बाळासारखे दोन व्हिडीओ करुन पाठवले आणि मला भूमिका मिळाली.” असे सुव्रत जोशीने सांगितले.
हेही वाचा : अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड २’ ने सहाव्या दिवशी रचला इतिहास; ‘इतक्या’ कोटींचा टप्पा केला पार
दरम्यान, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका २०१५ मध्ये ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित व्हायची. प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे या मालिकेचा दुसरा भाग ‘दिल दोस्ती दोबारा’ २०१७ मध्ये सुरु करण्यात आला होता. मालिकेच्या दोन्ही भागांमध्ये अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, पुष्कराज चिरपूटकर, पूजा ठोंबरे, स्वानंदी टिकेकर या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.