१४ फेब्रुवारी हा दिवस सर्वत्र व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. गेल्या आठवडाभर व्हॅलेंटाइन वीक सुरू आहे. आज व्हॅलेंटाइन दिनानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या पार्टनरसाठी खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. मराठमोळा अभिनेता सुयश टिळकची पत्नी आयुषीनेही त्याच्या बरोबरचा फोटो शेअर केला आहे.
आयुषी टिळकने सुयशला व्हॅलेंटाइन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. आयुषी सुयशबरोबरचा लिपलॉक किस करतानाचा फोटो शेअर केला आहे. आयुषी व सुयशच्या स्विमिंगपूलमधील या फोटोने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोला तिने “उफ, ये दिल का क्या करे…व्हॅलेंटाइन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस प्रेमाचा, मिठीचा आहे”, असं कॅप्शन दिलं आहे.
हेही वाचा>> पहिल्या पत्नीच्या दुसऱ्या लग्नाबाबत समजताच शालिन भानोत आश्चर्यचकित, म्हणाला “दलजित कौर आणि…”
सुयश व आयुषीने ऑक्टोबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडिवर व्हायरल झाले होते. सुयश व आयुषी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत ते दोघेही प्रेम व्यक्त करताना दिसतात.
सुयशने अनेक नाटक, मालिका व चित्रपटांतही काम केलं आहे. छोट्या पडद्यावरील ‘का रे दुरावा’ मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. सुयशची पत्नी आयुषी अभिनेत्री असून उत्तम डान्सरही आहे. युवा डान्सिंग क्वीन या रिएलिटी शोमध्येही ती झळकली होती.