सध्या छोट्या पडद्यावरच्या सगळ्या वाहिन्यांमध्ये टीआरपीसाठी चढाओढ चालू आहे. मालिकांचा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात असतो. या सगळ्या प्रेक्षकांना जोडून ठेवण्यासाठी वाहिनीकडून नेहमीच विविध प्रयत्न केले जातात. नव्या मालिका, कलाकारांची एन्ट्री, मालिकांमधील रंजक वळणं यामुळे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन होतं. ‘झी मराठी’ वाहिनीवर काही महिन्यांपूर्वी काही नव्या मालिका चालू झाल्या आहेत.

‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका मार्च महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. नुकताच मालिकेत लीला आणि एजे यांचा लग्नसोहळा पार पडला. आता हे दोघे कसा संसार करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच आता मालिकेत एका नव्या अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.

हेही वाचा : Video : खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी लग्नाआधी घेतली सोनाक्षी-झहीरची भेट, होणाऱ्या जावयाला सर्वांसमोर मिठी मारली अन्…

अभिनेत्री शर्मिला शिंदेने या मालिकेत दुर्गा किशोर जहागीरदार ही भूमिका साकारली आहे. या दुर्गाच्या भावाच्या रुपात मालिकेत एक नवीन एन्ट्री होणार आहे. यापूर्वी या अभिनेत्याने ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘स्वाभिमान’ आणि ‘शुभ विवाह’ या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. या अभिनेत्याचं नाव आहे रुचिर गुरव. अभिनेता रूचिर गुरव ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत दुर्गाचा भाऊ यशच्या भूमिकेत झळकणार आहे. यासंदर्भात शर्मिलाने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

हेही वाचा : प्रियांका चोप्राने न्यूयॉर्कमध्ये सुरू केलेलं ‘सोना’ रेस्टॉरंट बंद होणार, काही महिन्यांपूर्वी अभिनेत्रीने संपवली भागीदारी

शर्मिलाने रुचिरबरोबर फोटो शेअर करत “दुर्गाचा भाऊ यशला सर्वांनी हाय करा” असं कॅफ्शन दिलं आहे. तर, या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने #नवरीमिळेहिटलरला असंही लिहिलं आहे. यामुळे रुचिरची मालिकेत एन्ट्री होणार हे स्पष्ट झालं. शर्मिलाच्या या पोस्टवर कमेंट करत रुचिरने “थँक्यू सो मच ताई तू बेस्ट आहेस” असं लिहिलं आहे. यापूर्वी त्याने ‘स्वाभिमान’ मालिकेत मयंक, तर ‘शुभविवाह’ मालिकेत प्रशांत हे पात्र साकारलं होतं. आता यशच्या येण्याने जहागीरदारांच्या घरात काय ट्विस्ट येणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.

हेही वाचा : प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने गायलं आहे कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’चं ‘जमूरे’ गाणं! याआधी अजय देवगणच्या चित्रपटात केलेलं काम

दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत राकेश बापट, वल्लरी विराज, शर्मिला शिंदे, सानिका काशीकर, भुमिजा पाटील, भारती पाटील, उदय साळवी, शीतल क्षिरसागर, अक्षता आपटे, माधुरी भारती या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.