छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनतात. त्यामुळे जेव्हा या मालिका निरोप घेतात तेव्हा अनेकांना दु:ख होते. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील अशाच एका लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

‘स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा’ या मालिकेने ६९९ भागांचा यशस्वी टप्पा पूर्ण करून प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत अभिनेत्री आसावरी जोशी यांनी आदिती सूर्यवंशी ही भूमिका साकारली होती. आसावरी जोशींच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. त्यामुळे आता मालिकेचा शेवट झाल्यावर त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करीत भावना व्यक्त केल्या आहेत.

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो
Actress Amrita Subhash makes her directorial debut with a play
दिग्दर्शिका…झाले मी!
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”
Paaru
Video: पारू व आदित्यच्या मैत्रीत फूट पाडण्यात अनुष्का यशस्वी होणार का? पाहा ‘पारू’ मालिकेचा प्रोमो

आसावरी जोशींनी लिहिले आहे की, “आमची मालिका ‘स्वाभिमान’ आज प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. यामुळे माझ्याप्रमाणे तुम्हीसुद्धा भावुक झाला असाल, आम्ही आज मालिकेचा शेवट करीत आहोत. तुम्हा सर्वांचे मनोरंजन करता आले याचा अतिशय आनंद आहे. लवकरच मी एका नव्या मालिकेच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी तुमच्या सदिच्छांची गरज आहे…धन्यवाद!” आसावरी जोशी यांच्या या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा’ या मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता अक्षर कोठारी मुख्य भूमिकेत होते, तर आसावरी जोशी यांनी शांतनूची आई अर्थात आदिती सूर्यवंशी यांची भूमिका साकारली होती. यासोबतच सविता प्रभुणे, अशोक शिंदे, प्रसाद पंडित या कलाकारांचा सुद्धा मालिकेत सहभाग होता.

Story img Loader