‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेतून श्रृती म्हणून घराघरात पोहोचलेली अन् ‘माझा होशील ना’मधून सईच्या रुपातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री गौतमी देशपांडेचा आज वाढदिवस आहे. गौतमीने आपल्या दमदार अभिनयाने मराठी मनोरंजनसृष्टीत स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. अभिनयाबरोबरच गौतमी उत्कृष्ट गायिका देखील आहे. तिच्या आवाजाचे अनेक चाहते आहेत. सध्या गौतमी चिन्मय मांडलेकर लिखित दिग्दर्शित ‘गालिब’ या नाटकात काम करत आहे. त्यामुळे सध्या या नाटकातल्या तिच्या कामाचं कौतुक होताना दिसत आहे. आज वाढदिवसानिमित्ताने गौतमीचा नवरा स्वानंद तेंडुलकरने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.

गौतमी देशपांडेने गेल्या वर्षी २५ डिसेंबरला स्वानंद तेंडुलकरशी लग्नगाठ बांधली. मेहंदी, हळद, संगीत, सप्तपदी, रिसेप्शन असा समारंभपूर्वक लग्नसोहळा गौतमी-स्वानंदचा झाला. तेव्हापासून दोघं नेहमी चर्चेत असतात. दोघांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतीच स्वानंदने गौतमीच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट शेअर केली आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
Aishwarya Narkar Birthday
५० वर्षांच्या झाल्या ऐश्वर्या नारकर! ‘असा’ साजरा केला वाढदिवस; व्हिडीओत दाखवली संपूर्ण झलक, म्हणाल्या…
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”

हेही वाचा – Video: राकेश बापटचं मराठी मालिकाविश्वात पदार्पण; ‘झी मराठी’च्या ‘या’ नव्या मालिकेत झळकणार, पाहा दमदार प्रोमो

गौतमीबरोबरचा सुंदर फोटो शेअर करून स्वानंदने लिहिलं आहे, “या सुंदर स्त्रीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याबद्दल कृतज्ञ आहे. तुला खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद.”

हेही वाचा – Bigg Boss 17 जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीने सर्वात आधी ‘या’ व्यक्तीबरोबर केलं सेलिब्रेशन, व्हिडीओ आला समोर

दरम्यान, गौतमीचा नवरा स्वानंद तेंडुलकर ‘भाडिपा’ या मराठी सीरिज व कंटेट बनवणाऱ्या लोकप्रिय युट्यूब चॅनेलचा तो व्हाईस प्रेसिडंट म्हणून काम पाहतो आहे. त्याचा भाडिपाच्या वेब सीरिज आणि स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमात सहभाग असतो. शिवाय तो सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ करत असतो. गौतमीप्रमाणे स्वानंद तेंडुलकरचा चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे.

Story img Loader