मनोरंजन क्षेत्रात सध्या लग्नाचे वारे सुरु असल्याचं दिसून येत आहे. अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे, तसेच मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. आता लवकरच स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. स्वानंदी आणि आशिषच्या लग्नाची तयारीही सुरु झाली आहे. नुकतचं दोघांच्या घरच्यांचा केळवणाचा कार्यक्रम पार पडला.
हेही वाचा- Bigg Boss 17: नॉमिनेशन टास्कदरम्यान अंकिता लोखंडे आणि निल भट्टमध्ये कडाक्याचं भांडण, पाहा नवा प्रोमो
स्वानंदी आणि आशिषच्या घरच्यांच्या एकत्र केळवणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो स्वानंदी आणि आशिषने आपल्या इनस्टग्रामवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये स्वानंदी आणि आशिषचे कुटुंबीय दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी सुकन्या मोने यांनी स्वानंदी आणि आशिषच्या पहिल्या केळवणाचे आयोजन केले होते. या केळवणाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

काही महिन्यांपूर्वीच स्वानंदी आणि आशिषचा थाटा साखपुडा संपन्न झाला. आता लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत. स्वानंदी ही अभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी आहे. छोट्या पडद्यावरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. त्यानंतर ‘अस्सं माहेर नको गं बाई’, “अगं अगं सुनबाई…” या मालिकेत स्वानंदीने मुख्य भूमिका साकारली होती. तसेच स्वानंदीचा होणार नवरा आशिष कुलकर्णी हा उत्तम गायक आणि गीतकार आहे.
दरम्यान एका मुलाखतीत स्वानंदी व आशिषचे लग्न कधी, कुठे होणार याबाबत स्वानंदीचे वडील अभिनेते उदय टिकेकर यांनी खुलासा केला होता. उदय टीकेकर म्हणालेले, “स्वानंदी व आशिष यांचं लग्न डिसेंबरमध्ये होणार आहे. त्यांचं लग्न पुण्यातच होईल. आम्हीही पुण्याचेच आहोत आणि आशिषचं कुटुंबही पुण्याचं आहे. मी कामानिमित्त मुंबईत असतो. लग्नाचं ठिकाण पुणे असेल पण लोकेशन खूप सुंदर असेल.” अदयाप स्वानंदी आणि आशिषच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण समोर आलेलं नाही.