Ashish Kulkarni and Swanandi Tikekar Wedding : स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी यांचा विवाहसोहळा २५ डिसेंबरला थाटामाटात पार पडला. या दोघांच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी व त्यांच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. या जोडप्याच्या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याशिवाय अभिनेत्रीने तिच्या लग्नातील खास क्षण इन्स्टाग्रामवर व्हिडीओच्या रुपात शेअर केले आहेत.
स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णीने त्यांच्या लग्नसोहळ्यातील Unseen व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला या दोघांनी स्वत:च्या आवाजात गायलेलं “तेरे हवाले करदिया…” हे गाणं जोडण्यात आलं आहे. तसेच स्वानंदीच्या लग्नाचा लूक, मंगळसूत्र, सप्तपदी घेतानाचे खास क्षण या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत.
अभिनेत्री स्वानंदी टिकेकर ही शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर व ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकरांची लेक आहे. लाडक्या लेकीच्या लग्नात टिकेकर भावुक झाल्याचं हा व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
स्वानंदीने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी “बाबांच्या डोळ्यातले अश्रू”, “स्वानंदीचे भोळे बाबा, दोघांनाही खूप प्रेम”, “अभिनंदन मिस्टर अँड मिसेस कुलकर्णी”, “बाबा आणि स्वानंदी…तुम्हाला खूप प्रेम” अशा असंख्य कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, स्वानंदी-आशिषवर सध्या मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.