Ashish Kulkarni and Swanandi Tikekar Wedding : मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार गेल्या काही दिवसांत विवाहबंधनात अडकले आहेत. आता लवकरच ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. दोघांच्या घरी सध्या लग्नाची जोरदार तयारी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. जुलै महिन्यात साखरपुडा झाल्यावर दोघांचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झालेली आहे.

स्वानंदीने तिच्या मेहंदी सोहळ्याचा खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत मेहंदी सोहळ्यासाठी फुलांची आकर्षक सजावट केल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच एका मोठ्या फलकावर “वेलकम टू स्वानंदीची मेहंदी…” असं लिहिण्यात आलं आहे. तसेच या फोटोवर “आनंदी…” असा हॅशटॅग वापरण्यात आला आहे.

हेही वाचा : प्रेमाची गोष्ट : मुक्ता-सागरच्या लग्नात सावनीचा ऑफस्क्रीन जबरदस्त डान्स! व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “लग्न कोणाचंही असो…”

दरम्यान, स्वानंदी टिकेकर ही अभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी आहे. छोट्या पडद्यावरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. त्यानंतर ‘अस्सं माहेर नको गं बाई’, “अगं अगं सुनबाई…” या मालिकेत स्वानंदीने मुख्य भूमिका साकारली होती. तसेच स्वानंदीचा होणारा नवरा आशिष कुलकर्णी हा उत्तम गायक आणि गीतकार आहे. लवकरच दोघेही विवाहबंधनात अडकणार आहे.

Story img Loader