अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णी यांचा साखरपुडा जुलै महिन्यात पार पडला होता. रिलेशनशिपबाबत अधिकृत घोषणा केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत स्वानंदी-आशिषने साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. तेव्हापासून या दोघांचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आशिषने नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून दोघंही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

थाटामाटात साखरपुडा केल्यावर आशिष-स्वानंदी आफ्रिकेत फिरायला गेले होते. याशिवाय या दोघांसाठी जवळच्या कुटुंबीयांनी खास केळवणाचं आयोजन केलं होतं. त्याचे अनेक व्हिडीओ व फोटो सोश मीडियावर व्हायरल झाले होते. आता आशिषने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेला फोटो चर्चेत आला आहे.

e a man holding mirror for a wife while doing makeup in mahakumbh mela
Video : नवऱ्याचं असं प्रेम मिळायला नशीब लागतं राव! बायकोला मेकअप करताना त्रास होऊ नये म्हणून… महाकुंभ मेळ्यातील व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding actress reacts on trolling
“पियुष माणूस म्हणून कोणापर्यंतच पोहोचलेला नाही” लग्नाबद्दल पहिल्यांदाच बोलली सुरुची अडारकर; म्हणाली, “त्याचा भूतकाळ हा…”
Wife husband's first priority
‘जेव्हा ती त्याची फर्स्ट प्रायोरिटी असते…’ भरसाखरपुड्यात त्याने डोळ्यांच्या हावभावांनी व्यक्त केलं प्रेम; VIDEO पाहून म्हणाल, ‘पती असावा तर असा…’
husband dance with disabled wife
‘असे टिकते नाते!’ दिव्यांग पत्नीसाठी नवऱ्याने केला जबरदस्त डान्स! VIDEO पाहून तुमच्याही चेहऱ्यावरील येईल हसू
son-in-law dance with father-in-law
‘बाबा, असा जावई शोधून सापडणार नाही…’ भरमंडपात जावयानं भावी सासऱ्यांबरोबर केलं असं काही… VIDEO पाहून कराल कौतुक
karan veer mehra second wife got married
करण वीर मेहराच्या दुसऱ्या बायकोने केलं लग्न, अभिनेत्रीने मंदिरात बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर
Nagpur, Love marriage, husband and wife ,
नागपूर : प्रेमविवाहानंतर ४,९४७ पती-पत्नीच्या संसारात विघ्न; भरोसा सेलकडून नवविवाहित दाम्पत्यांचे….

हेही वाचा : “डोळे बंद करून…”, वडिलांच्या वाढदिवशी जिनिलीयाने शेअर केली खास पोस्ट, रितेश देशमुखच्या सासऱ्यांना पाहिलंत का?

आशिषने या रोमँटिक फोटोला “फक्त ६ दिवस बाकी…” असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे आशिष-स्वानंदी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यापूर्वी अभिनेत्रीचे वडील उदय टिकेकर यांनी देखील स्वानंदी-आशिष डिसेंबर महिन्यात लग्न करतील आणि त्यांचं लग्न पुण्यात होईल असं मीडियाशी संवाद साधताना सांगितलं होतं.

हेही वाचा : शाहरुख खान : ४ वर्षांच्या ब्रेकनंतर ‘पठाण’ने बाजी पालटली अन् सांगितलं मीच खरा ‘बादशहा’!

swanandi
स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी

दरम्यान, स्वानंदी टिकेकर ही अभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी आहे. छोट्या पडद्यावरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. त्यानंतर ‘अस्सं माहेर नको गं बाई’, “अगं अगं सुनबाई…” या मालिकेत स्वानंदीने मुख्य भूमिका साकारली होती. तसेच स्वानंदीचा होणार नवरा आशिष कुलकर्णी हा उत्तम गायक आणि गीतकार आहे. लवकरच दोघेही विवाहबंधनात अडकणार आहे.

Story img Loader