अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. स्वानंदी अभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची मुलगी आहे. मात्र, स्वानंदी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्राकडे वळली. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतून स्वानंदीला खरी ओळख मिळाली. नुकतचं स्वानंदीने आपल्या प्रेमाची कबूली देत लग्न करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
स्वानंदीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअऱ केली आहे. स्वानंदी गायक आशिष कुलकर्णीबरोबर लग्न करणार आहे. आशिषबरोबरचा फोटो शेअर करत स्वानंदीने ही आनंदाची बातमी दिली आहे. पोस्टबरोबर स्वानंदीने आमचं ठरलं आणि लव्ह असे दोन हॅशटॅगही दिले आहेत.
स्वानंदीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका दिल दोस्ती दुनियादारमध्ये स्वानंदीने मिनलची भूमिका साकारली होती. ही मलिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. त्यानंतर स्वानंदी ‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती. सोनी मराठीवरील ‘सिंगिंग स्टार’ या गायनाच्या कार्यक्रमाचे स्वानंदीने विजेतेपद पटकावले आहे. तिने ‘इंडियन आयडल मराठी’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले आहे.
आशिष कुलकर्णीबाबत बोलायचं झालं तर आशिष एक गायक आणि गीतकार आहे. २००८ मध्ये, त्याने झी मराठीच्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मध्ये भाग घेतला होता. २०१५ मध्ये त्याने मित्रांसोबत ‘रॅगलॉजिक’ हा संगीत बँड तयार केला. हार्ड रॉक कॅफे, हाय स्पिरिट्स, ब्लूफ्रॉग यांसारख्या अनेक लोकप्रिय म्युझिक बँडबरोबर त्याने काम केलं आहे. २०२० मध्ये, आशिषने “इंडियन आयडॉल सीझन १२ मध्ये भाग घेतला होता.