अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व गायक आशिष कुलकर्णी यांचा विवाहसोहळा २५ डिसेंबर २०२३ रोजी पार पडला. सध्या या दोघांच्या मेहंदी, संगीत व लग्न समारंभाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच स्वानंदीने लग्न झाल्यावर घेतलेल्या उखाण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वानंदी-आशिषच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील कलाकार व जवळचे नातेवाईक उपस्थित होते. जुलै महिन्यात प्रेमाची कबुली देत या दोघांनी थाटामाटात साखरपुडा केला होता. तेव्हापासून या दोघांचे चाहते यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. अभिनेत्रीने तिच्या लग्नातील सर्व फोटोंना “आनंदी…” हा हॅशटॅग वापरला आहे. आशिष-स्वानंदी या दोघांच्या नावातील काही अक्षरं एकत्र करून या जोडप्याने ‘आनंदी’ हा नवीन हॅशटॅग तयार केला होता.

हेही वाचा : मालिकांच्या टीआरपी शर्यतीवरून प्रसिद्ध दिग्दर्शकाची खोचक पोस्ट, रणबीर कपूरचं उदाहरण देत म्हणाले, “सून माझी Animal…”

लग्नसोहळ्यातील विविध फोटोंप्रमाणे सध्या स्वानंदीने घेतलेल्या उखाण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. उखाणा घेत अभिनेत्री म्हणते, “मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर-माहेरची खूण आशिषचं नाव घेते कुलकर्ण्यांची सून.” बायकोने घेतलेला हा छानसा उखाणा ऐकून आशिष कुलकर्णीने तिचं भरभरून कौतुक केलं. यानंतर तो स्वानंदीसाठी “स्वानु मेरी जान…” हे गाणं गायला. त्यांच्या लग्नसोहळ्यातील या खास क्षणाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाने लोणावळ्यात बांधली लग्नगाठ, फोटो पाहिलेत का?

दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर स्वानंदी टिकेकर ही अभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी आहे. छोट्या पडद्यावरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. त्यानंतर ‘अस्सं माहेर नको गं बाई’, “अगं अगं सुनबाई…” या मालिकेत स्वानंदीने मुख्य भूमिका साकारली होती. तसेच आशिष कुलकर्णी हा उत्तम गायक आणि गीतकार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swanandi tikekar ashish kulkarni wedding update actress took ukhana after marriage sva 00
First published on: 26-12-2023 at 20:02 IST