‘दिल दोस्ती दुनियादारी’फेम अभिनेत्री स्वानंदी टिकेवर व गायक आशीष कुलकर्णी २५ डिसेंबर २०२३ रोजी लग्नबंधनात अडकले पुण्यात दोघांच्या शाही विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. स्वानंदी व आशीषच्या लग्नात मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
आता लग्नानंतर स्वानंदी फिरायला गेली असल्याचे दिसून येत आहे. स्वानंदी हिमाचलमध्ये फिरायला गेली आहे. स्वानंदीने आपल्या इनस्टाग्रामवर तिथले काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. हिमाचल प्रदेशातील थंड वातावरणाचा स्वानंदी आनंद घेताना दिसत आहे. स्वानंदीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. स्वानंदीचे वडील अभिनेते उदय टिकेकरी यांनीही कमेंटमध्ये हार्ट ईमोजी शेअर केली आहे.
स्वानंदीने हा व्हिडीओ शेअर करत “प्रेम आणि कृतज्ञतेने परिपूर्ण” अशी कॅप्शनही दिली आहे. पण स्वानंदीने शेअर केलेल्या फोटोमध्ये आशीष कुठेच दिसत नाही. त्यामुळे स्वानंदी नेमकी कोणाबरोबर हिमाचलला फिरायला गेली? आणि आशीष कुठे आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
स्वानंदी व आशीषच्या मेहंदीपासून सप्तपदीपर्यंतच्या सगळ्या विधीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नात दोघांनी पारंपारिक लूक परिधान केला होता. स्वानंदीने पिवळ्या रंगाची पैठणी नेसली होती व आशीषने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. लग्नबंधनात अडकल्यानंतर चाहत्यांबरोबर अनेक कलाकारांनी स्वानंदी व आशिषवर अभिनंदनाचा वर्षाव केला होता.