गणेशोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे. गणपती बाप्पाला मोदक प्रचंड आवडतात. त्यामुळे गणपतीच्या ११ दिवसांमध्ये घरोघरी विविध प्रकारचे मोदक बनवले जातात. अभिनेत्री स्वानंदी टिकेकरनेसुद्धा लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी खास उकडीचे मोदक बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा- शिव ठाकरेच्या घरी वर्दीतला बाप्पा विराजमान; जंगी मिरवणूकीत ५० पोलिसांचा सहभाग
स्वानंदीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत स्वानंदी उकडीचे मोदक बनवताना दिसत आहे. पण खूप प्रयत्न करुनही स्वानंदीला काही मोदकाचा आकार जमला नाही. मोमोज सारखा मोदकाचा आकार झाल्याचं दिसत आहे. स्वानंदीने या व्हिडीओला मोदकचा झाला मोमो असं कॅपशन दिलं आहे.
हेही वाचा- “‘खुपते तिथे गुप्ते’ का बंद करताय?”, चाहत्याच्या प्रश्नाला अवधूत गुप्तेने दिलं उत्तर, म्हणाला…
स्वानंदीच्या या मजेशीर व्हिडीओवर चाहते भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेता यशोमनने कमेंट करत लिहिलं “वाह!!! ओ कुलकर्णी!!! मुलीला मोदक जमत नाहीत! आता बसा बोंबलत” तर दुसऱ्या नेटकऱ्याने “नवीन पदार्थ म्हणून खपवा…सारणाचे मोमोज” अशी कमेंट केली आहे. आणखी एकाने “खाणंच सोप आहे “जावू द्या करायच्या भानगडीत नका पडू” अशी कमेंट करत सल्ला दिला आहे.
दरम्यान स्वानंदी आणि प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णी यांचा नुकताच साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वी स्वानंदीने ‘आमचं ठरलं’ असं म्हणत जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली होती. आता साखरपुड्यानंतर डिसेंबरमध्ये स्वानंदी आणि आशिष लग्न करणार आहेत. पुण्यामध्ये दोघांच लग्न होणार आहे.
स्वानंदी ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेसाठी विशेष ओळखली जाते. ‘अस्सं माहेर नको गं बाई’, “अगं अगं सुनबाई…” या मालिकेत स्वानंदीने मुख्य भूमिका केल्या होत्या. तर आशिष ‘इंडियन आयडॉल’मध्ये दिसला होता.