स्वप्निल जोशी हा मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमात त्याने आतापर्यंत काम केलं आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील ‘चॉकलेट हिरो’ म्हणून तो प्रसिद्ध आहे. त्याचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. त्याच्या प्रत्येक कलाकृतीवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. पण इतकंच नाही, तर स्वप्निल जोशी हा मराठीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे.
गेल्या काही वर्षात स्वप्निल अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये झळकला. पण ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेच्या माध्यमातून त्याने मोठ्या कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. चित्रपटापेक्षा मालिकेत काम करताना मानधन थोडं कमी मिळतं असं अनेकजण म्हणत असतात. पण स्वप्निल याला अपवाद आहे. ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेच्या एका भागासाठी तो मोठी किंमत आकारतो. मानधनाच्या बाबतीत त्याने अनेक हिंदी कलाकारांनाही मागे टाकलं आहे.
आणखी वाचा : ‘बिग बॉस’मधून राखी सावंतचा पत्ता होणार कट? घरातली भांडी फोडल्याने अभिनेत्रीबाबत घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, एका चित्रपटासाठी काही लाख रुपये फी घेणारा स्वप्निल ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेच्या एका भागासाठी ६० ते ७० हजार रुपये मानधन आकारतो. मराठी मालिका विश्वात स्वप्निल जोशी इतकं मानधन आकारणारा दुसरा कोणताही कलाकार नाही.
हेही वाचा : उत्तम प्रतिसाद मिळणाऱ्या कलाकृतीतून ‘या’ कलाकारांनी अचानक घेतलेली एक्सिट ठरला चर्चेचा विषय
‘तू तेव्हा तशी’ या मालिकेच्या निमित्ताने स्वप्निलने आठ वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. या मालिकेतील त्याच्या सहजसुंदर कामाचे सर्वजण कौतुक करताना दिसतात. यासोबतच त्याची आणि शिल्पा तुळसकर यांची केमिस्ट्री ही प्रेक्षकांना चांगलीच भावलेली आहे. मालिकेत काम करता करता स्वप्निल ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम तसंच त्याच्या चित्रपटांचही शूटिंग करत आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र स्वप्निलचीच चर्चा आहे.