भारतात कोरियन ड्रामा आणि जगातील इतर भाषेतील चित्रपट व मालिका आवडीने पाहिल्या जातात. अनेक मराठी प्रेक्षकही हे शो आवडीने पाहतात. पण मराठी मालिकाही विदेशात पाहिल्या जातात, हे तुम्हाला माहीत आहे का? होय. मराठी मालिका इंग्रजीत डब करून दक्षिण आफ्रिकेत पाहिल्या जातात. ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका दक्षिण आफ्रिकेत खूप लोकप्रिय आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वप्नील जोशी व शिल्पा तुळसकर यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘तू तेव्हा तशी’ ही मराठीतील लोकप्रिय मालिका होती. ही मालिका आता संपली असली तरी ती विदेशात इंग्रजी भाषेत प्रसारित होत आहे. या मालिकेची इंग्रजीत डब केलेली एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. “मराठी मालिका हिंदीत डब केलेल्या खूप विचित्र वाटतात. त्या झी आफ्रिका चॅनलवर प्रसारित होत आहे,” या कॅप्शनसह एका युजरने व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. ‘नेव्हर टू लेट फॉर लव्ह’ या नावाने ही मालिका प्रसारित केली जात आहे.

एकेकाळी अफेअरच्या चर्चा, आता मनीषा कोईरालाबद्दल विचारताच नाना पाटेकर म्हणाले, “तिचा फोन नंबर…”

व्हिडीओत पुष्पवल्ली अनामिकाला पटवर्धनांच्या घरात येण्यापासून रोखते तो सीन आहे. त्यानंतर माईमावशी तिला कानाखाली मारतात आणि हे फक्त पटवर्धनांचं घर नाही, असं म्हणताना दिसतात. हा सीन पाहून एका युजरने विचारलं की “हे लोक उखाणे, वटपौर्णिमा, गणेशोत्सव या गोष्टींचं भाषांतर कसं करतात?”

२५० कोटींचे कर्ज फेडण्यासाठी विकलं ऑफिस? आमदार धिरज देशमुखांचे सासरे म्हणाले, “मी गेल्या ३० वर्षांपासून…”

‘तू तेव्हा तशी’ ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. यात सौरभ पटवर्धनची भूमिका स्वप्नील जोशीने, तर अनामिका दीक्षितची भूमिका शिल्पा तुळसकरने केली होती. सुहास जोशी, रूमानी खरे, स्वानंद केतकर, रमा नाडगौडा, अभिषेक रहाळकर, अभिज्ञा भावे, उज्ज्वला जोग आणि सुनील गोडबोले यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

कॉलेजला असताना सौरभ पटवर्धनला अनामिका आवडायची, पण अनामिकाचं दुसऱ्यावर प्रेम होतं आणि ती त्याच्याशी लग्न करते. त्यानंतर वयाची चाळीशी ओलांडल्यावर पुन्हा एकदा सौरभ व अनामिका भेटतात आणि त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग, पुन्हा होणारं प्रेम, प्रेमात पडल्यावर येणाऱ्या अडचणी या गोष्टी या मालिकेत दाखवण्यात आल्या होत्या. ही मालिका झी मराठीवर २२ मार्च २०२२ ते २६ मार्च २०२३ या काळात प्रसारित झाली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swapnil joshi marathi serial tu tevha tashi dubbed in english released on zee africa see video hrc