छोट्या पडद्यावरील ‘तू तेव्हा तशी’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतून स्वप्नील जोशी व शिल्पा तुळसकर यांनी बऱ्याच काळानंतर मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं. झी वाहिनीवरील या मालिकेत स्वप्नील व शिल्पा मुख्य भूमिकेत आहेत. ‘तू तेव्हा तशी’मधील अनामिका व सौरभ ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. परंतु, लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

‘तू तेव्हा तशी’ मालिकेने नुकतेच ३०० भाग पूर्ण केले आहेत. अनेक कठीण परिस्थितीतून गेलेल्या अनामिका व सौरभ या कपलची लव्ह स्टोरी या मालिकेतून पडद्यावर दाखवण्यात आली होती. वयाच्या चाळीशीत पुन्हा प्रेमात पडलेल्या स्वप्नील जोशी व शिल्पा तुळसकरची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांनाही भावली. झी वाहिनीवरील इतर मालिकांप्रमाणे या ‘तू तेव्हा तशी’लाही प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळालं.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो

हेही वाचा>> इरफान खानच्या गर्लफ्रेंडला डेट करत होता नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्याला समजलं अन्…

सध्या ‘तू तेव्हा तशी’ मालिका रंजक वळणावर आहे. या मालिकेतील वल्ली हे पात्र अनामिका व सौरभला वेगळं करण्यासाठी कट कारस्थान करत आहे. त्यामुळे अनामिका व सौरभच्या नात्यात पुन्हा वादळ आलं आहे. एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय घडणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तू तेव्हा तशी मालिकेत स्वप्नील जोशी व शिल्पा तुळसकरचा ऑन स्क्रीन रोमान्सही प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता.

हेही वाचा>> Selfiee Box Office Collection: अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ सपशेल फेल! चौथ्या दिवशी चित्रपटाने जमवला फक्त ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

स्वप्नील जोशी व शिल्पा तुळसकरसह या मालिकेत अभिज्ञा भावे, सुहास जोशी, रुमाणी खरे या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका रात्री ८ वाजता प्रसारित व्हायची. आता या मालिकेच्या जागी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत शिवानी रांगोळे व हृषिकेश शेलार हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Story img Loader