Tula Shikvin Changlach Dhada Fame Swapnil Rajshekhar : रोजचा प्रवास करताना निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या, रस्त्यावरचे खड्डे अशा सामाजिक विषयांवर अनेक मराठी कलाकार सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसतात. कित्येक कलाकारांना वाहतूक कोंडीमुळे शूटिंग सेटवर पोहोचण्यास देखील विलंब झालेला आहे. प्रवास करतानाचा असाच एक व्हिडीओ शेअर करत अभिनेते स्वप्नील राजशेअर यांनी लक्ष वेधून घेतलं आहे.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत चारुहासची भूमिका साकारणारे अभिनेते स्वप्नील राजशेखर ( Swapnil Rajshekhar ) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. विविध सामाजिक विषयांवर ते कायम आपलं मत मांडतात. काही दिवसांपूर्वी अभिनेते केरळ फिरायला गेले होते. यावेळी त्याठिकाणचं निसर्गसौंदर्य, स्वच्छता पाहून स्वप्नील राजशेखर भारावून गेले होते. यावेळी त्यांनी उपरोधिक पोस्ट शेअर करत एका वेगळ्या अंदाजात आपल्याकडे सुद्धा पर्यटनस्थळी स्वच्छतेच्या बाबतीत बदल झाला पाहिजे असं सूचित केलं होतं. आता पुन्हा एकदा स्वप्नील राजशेखर यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत आपलं मत काहीशा वेगळ्या अंदाजात आणि कोल्हापुरी भाषेत मांडलं आहे.

Torres scam
दागिने बनविणाऱ्या ‘टोरेस’च्या कार्यालयांबाहेर गर्दीमुळे तणाव; विदेशी कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Marathi actress Aishwarya Narkar Dance With Ashwini Kasar on Ranbir Kapoor song
Video: ऐश्वर्या नारकर यांनी अश्विनी कासारबरोबर केला सुंदर डान्स, पाहा व्हिडीओ
iim bangalore student death
२९ वा वाढदिवस साजरा केला आणि विद्यार्थ्याचा काही तासातच झाला मृत्यू; IIM बंगळुरुमधील धक्कादायक घटना
Savlyachi Janu Savli
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांचा ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, “तुम्ही किती…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
highest paid man in the world
तासाला दोन कोटी, तर वर्षाला १७ हजार कोटी; जगात सर्वाधिक पगार घेणारे जगदीप सिंग कोण आहेत?
torres scam in mumbai
Video: “आठवड्याला ११ टक्के व्याज मिळणार होतं, पण…”, ‘टोरेस’नं ग्राहकांना फसवलं, पैसे गुंतवून पश्चात्ताप झाल्यानं नागरिक हवालदिल!

हेही वाचा : अल्लू अर्जुननंतर राम चरणच्या सिनेमाच्या कार्यक्रमाला गालबोट; दोन चाहत्यांचं निधन, निर्मात्यांनी मदतीची केली घोषणा

स्वप्नील राजशेखर यांची पोस्ट

स्वप्नील राजशेखर ( Swapnil Rajshekhar ) म्हणतात, “काहीजण रोज उठून रस्त्यावरच्या खड्ड्यांच्या नावाने बोटं मोडतात. त्या सगळ्यांना मला एक सांगायचंय, अहो… वर्षानुवर्षे, महिनोंमहिने हे सगळे खड्डे जपलेत, राखलेत हे सगळं उगाचाच नाहीये. यामागे एक विचार आहे. तो विचार समजून घ्या. किती अशी माणसं आहेत हो…ज्यांचं अगदी बुळबुळीत रस्त्यासारखं आयुष्य आहे. तुमच्या-माझ्या रोजच्या जगण्यामध्ये कितीतरी खड्डे-डबरे येतात. महागडी गाडी खरेदी केलेली असते, हेल्थ विमा काढलेला असतो. दर महिन्याला याचा हफ्ता भरायचा असतो. दर वीकेंडला बायको-मुलांना घेऊन हिल स्टेशनला जावं लागतं…किती मोठा खड्डा पडतो. मावस मेहुणीला महागडं गिफ्ट द्यावं लागतं…आपलं पोरगं पहिलीतून दुसरीत जाताना इंग्रजी शाळेची फी भरावी लागते या सगळ्यात मागे हटून चालणार नाही…म्हणून हे खड्डे.”

“परवा आमचे एक आजोबा गेले असं डॉक्टरांनी घोषित केलं. त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून लोक घरी घेऊन जात होते. वाटेत एक खड्डा आला, रुग्णवाहिका आदळली आणि आजोबा दाणकन् उठून बसले. गेलेला माणूस परत आला… लक्षात घ्या, एका माणसाचा जीव वाचला या खड्ड्यांमुळे… लोक उठतात आणि रस्ते बाद आहेत म्हणून शिव्या घालतात पण, आता आपणच समजलं पाहिजे… प्रत्येकाच्या आयुष्यात खड्डा पाहिजे म्हणून तो ठेवलाय.” अशी उपरोधिक पोस्ट शेअर करत अभिनेत्याने मत मांडलं आहे.

हेही वाचा : YJHD : ११ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित झाला रणबीर-दीपिकाचा रोमँटिक चित्रपट! फक्त ३ दिवसांत कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

दरम्यान, स्वप्नील राजशेखर यांचा उपरोधिक व्हिडीओ पाहून अभिनेत्याला नेमकं काय सुचित करायचंय याचा मतितार्थ सर्वांनाच लक्षात आलेला आहे. त्यांचा हा कोल्हापुरी ठसरेबाज अंदाज कमेंट्समध्ये अनेकांना भावला आहे. “वाह भाई वाह”, “आता काय बोलावं बाबा या बोलण्याला?”, “विषय हार्ड आहे हो तुमचा”, “स्वप्नील काय कमाल व्यक्त झालात…”, “जबरा”, “भन्नाट अन् हसून पुरेवाट” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर ( Swapnil Rajshekhar ) केल्या आहेत.

Story img Loader