मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसात मुग्धा-प्रथमेश, स्वानंदी-आशिष, गौतमी-स्वानंद, सुरुची-पियुष या लोकप्रिय जोड्या लग्नबंधनात अडकल्या. तसेच महिन्याभरापूर्वी पूजा सावंतने जोडीदाराबरोबरचे फोटो शेअर करत साखरपुड्याची घोषणा केली होती. आता मराठी मनोरंजनसृष्टीतील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. तिचा साखरपुडा नुकताच पार पडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेतून अभिनेत्री स्वरदा ठिगळे घराघरांत लोकप्रिय झाली. तिने सोशल मीडियावर अचानक साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्धार्थ राऊत असं आहे. इन्स्टाग्रामवर नमूद केल्यानुसार सिद्धार्थ इंटिरियर डिझायनर आहे.

हेही वाचा : मालिकाविश्व गाजवणाऱ्या जुई गडकरीची पहिली कमाई किती होती माहितीये का? स्वत: खुलासा करत म्हणाली…

साखरपुड्याच्या व्हिडीओला कॅप्शन देत स्वरदा लिहिते, “जर आयुष्यात योग्य व्यक्तीला तुम्ही भेटलात, तर तुम्ही त्या व्यक्तीला नाही कसं म्हणू शकता? आमच्या या आनंदात सहभागी झाल्याबद्दल कुटुंबीयांचे आणि सर्व मित्रमंडळींचे खूप खूप आभार!”

हेही वाचा : Video: आयरा-नुपूरच्या रिसेप्शन पार्टीला एकत्र पोहोचले रिंकू राजगुरू अन् आकाश ठोसर, पाहा व्हिडीओ

स्वरदा ठिगळेने साखरपुड्याची घोषणा करताच मनोरंजनसृष्टीतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. याशिवाय ती ‘प्यार के पापड’ या हिंदी मालिकेत सुद्धा झळकली होती. परंतु, २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेमुळे स्वरदाला घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. दरम्यान, स्वरदाचे चाहते आता तिच्या लग्नसोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swarajya saudamini tararani fame actress swarda thigale engagement video viral on instagram sva 00