अभिनेत्री स्पृहा जोशीची नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘सुख कळले’ या नव्या मालिकेत स्पृहा झळकणार आहे. अभिनेता सागर देशमुखबरोबर स्पृहा नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेचे दोन नवे प्रोमो आले; जे चांगलेच व्हायरल झाले होते. आता स्पृहाच्या नव्या मालिकेविषयी एक नवीन अपडेट समोर आली आहे. या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री आपल्या मुलासह झळकणार आहे. या अभिनेत्रीचा ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाशी खास कनेक्शन आहे.
गेल्या १० वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ या विनोद कार्यक्रमाने अलीकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या कार्यक्रमात प्रसिद्ध संगीत संयोजक आणि संगीतकार तुषार देवल सुरुवातीपासून दिसला. तसेच काही भागांमध्ये त्याची पत्नी स्वाती देवल झळकली. शिवाय मुलगा स्वराध्य देवलही पाहायला मिळाला. आता स्वाती देवल व स्वराध्य देवल स्पृहाच्या जोशीच्या नव्या मालिकेत दिसणार आहे. यासंदर्भात स्वातीने स्वतः सोशल मीडियावर नुकतीच पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा – कार्तिकी गायकवाडने आनंदाची बातमी देताच मुग्धा वैशंपायन झाली भावुक, म्हणाली, “खूप…”
स्वातीने ‘सुख कळले’ मालिकेचा प्रोमो शेअर करत लिहिलं, “नमस्कार मंडळी….तुम्ही ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये मला भरभरून प्रेम दिलं, ‘राणी मी होणारं’च्या कांतावर ही करताय… आता पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीला येते आहे…नवीन भूमिकेतून माझ्या स्वराध्यला घेऊन, नव्या टीम बरोबर…नक्की बघा ‘सुख कळले’ आपल्या ‘कलर्स मराठी’वर…लवकरच.”
हेही वाचा – “लग्न कधी करतोय?”,’टाइमपास’ फेम अभिनेत्यानं चाहत्याच्या प्रश्नाला दिलं उत्तर, म्हणाला, “लग्न आणि…”
दरम्यान, २२ एप्रिलपासून स्पृहाची ‘सुख कळले’ ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत स्पृहा, सागर यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, बालकलाकार मिमी खडसेसह बरेच कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे सध्या प्रेक्षकांमध्ये या मालिकेविषयी उत्सुकता दिसत आहे.