झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका प्रेक्षक आवडीने पाहतात. या मालिकेमध्ये मीनाक्षी वहिनी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच स्वाती देवल. मालिकेमधील स्वातीच्या भूमिकेनेही प्रेक्षकांना आपलंस केलं. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘चला हवा येऊ द्या’मधील प्रसिद्ध संगीत संयोजक आणि संगीतकार तुषार देवलची ती स्वाती पत्नी आहे. दोघंही सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्रीची झाली सर्जरी, रुग्णालयातील फोटो शेअर करत मानले डॉक्टरांचे आभार; म्हणते “माझ्या नवऱ्यानेही…”

स्वाती सध्या आराम करत आहे. एक छोटी सर्जरी झाली असल्याचं तिने रुग्णालयातील फोटो पोस्ट शेअर करत सांगितलं. याआधी तिने नवऱ्याबरोबरचा एक धमाल व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला. या व्हिडीओची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली.

स्वातीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुषार जेवून झालेलं ताट किचनमध्ये असंच ठेवून निघून जातो. ते पाहून देवपूजा करत असलेली स्वाती त्याच्याकडे रागाने बघते. पत्नी रागाने पाहत आहे हे बघून तो तसाच पाठी फिरतो. त्यानंतर काही वेगळंच घडताना दिसतं.

आणखी वाचा – पांढरे केस, मिशी अन् थकलेला चेहरा, अविनाश नारकरांना तुम्ही ओळखलं का? लग्नाला २७ वर्ष पूर्ण होताच म्हणाले…

पत्नीच्या भितीने तो चक्क स्वयंपाकघरामध्ये भांडी घासतो. ते पाहून स्वातीला अगदी आनंद होतो. या दोघांनी अगदी मजेशीर अंदाजात हा व्हिडीओ बनवला आहे. स्वाती-तुषारचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झालं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swati deval share funny video with husband tushar deval post goes viral on social media see details kmd