अभिनेत्री अमृता देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. फोटो, व्हिडीओ, तसेच दैनंदिन जीवनातले अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने ‘झी नाट्य गौरव’चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्यानिमित्ताने भावनिक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर अमृताने आज तिची वहिनी म्हणजेच ‘ताली’ फेम अभिनेत्री कृतिका देवची पोस्ट शेअर केली आहे; ज्यामध्ये ती वहिनीने बनवलेलं खानदेशी जेवण दाखवत आहे.

अमृता देशमुखचा सख्खा भाऊ अभिनेता अभिषेक देशमुख याची पत्नी कृतिका देव आहे. कृतिकाने आज खास जेवणात खानदेशी भरीत व भाकरी केली होती. याचा व्हिडीओ अमृताने इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केला आहे. यामध्ये अमृता कृतिकाला म्हणते, “इतकं छान केलंय… खानदेशी झाली बो…”

prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “मी शब्दांत शूर, पण सुरात असूर”, मुख्यमंत्र्यांच्या विधानाने हशा; म्हणाले, “लोकांचा गैरसमज होतो की…”
akash fundkar loksatta news
मंत्री आकाश फुंडकर म्हणतात, “पालकमंत्रिपदावर दावा नाही, पण पक्षादेश…”
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
Bollywood actor varun Dhawan reveals wife of a powerful man broke into his house without permission
वरुण धवनच्या घरात घुसली होती चाहती, प्रसंग सांगत अभिनेता म्हणाला, “एका पॉवरफुल व्यक्तीची ती पत्नी होती अन्…”

हेही वाचा – दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची आई हॉस्पिटलमध्ये दाखल, पन्नाशीत देणार जुळ्या मुलांना जन्म?

शिवाय या व्हिडीओवर अमृताने लिहिलं आहे, “कृतिका वहिनी, खानदेशी भरीत व भाकरी बनवल्यानंतर लाजतेय.” या व्हिडीओत अमृता, कृतिकासह अभिषेक देखील पाहायला मिळत आहे. अमृताची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.

हेही वाचा – “मला अतिशय अभिमान…”, मधुरा वेलणकरने सासरे शिवाजी साटम यांचं केलं कौतुक, म्हणाली, “२३ वर्ष CID…”

दरम्यान, अमृताची वहिनी म्हणजे कृतिकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, रवी जाधव दिग्दर्शित ‘ताली’ या लोकप्रिय सीरिजमध्ये ती झळकली होती. तिने तृतीयपंथी गौरी सावंत यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. याआधी तिने बऱ्याच मराठी चित्रपटातही काम केलं आहे. तसेच कृतिकाचा नवरा अभिषेक ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत त्याने यशची भूमिका साकारली आहे.

Story img Loader