‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका आहे. या मालिकेतील एका अभिनेत्रीने तिचं १७ किलो वजन अवघ्या काही महिन्यांत कमी केलं आहे. तिने वजन घटवण्यासाठी काय केलं, त्यासंदर्भात माहिती शेअर केली आहे. तिचा वजन कमी करण्याचा प्रवास हा लठ्ठपणाचा सामना करणाऱ्या अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री, गायिका आणि एन्फ्लुएन्सर दीप्ती साधवानीने तिचा मागील सहा महिन्यांमधील फिटनेस प्रवास सांगितला आहे. तिने मागील सहा महिन्यांत दीप्तीने तब्बल १७ किलो वजन कमी केले आहे. दीप्तीने सांगितलं की वजन कमी करणं हे खूप कठीण होतं. “हे सोपं नव्हतं. या प्रवासात असे अनेक दिवस आले जेव्हा मला वाटलं की आता नाही करायचं. पण मी वेळोवेळी स्वतःला आठवण करून दिली की प्रत्येक लहान गोष्ट या प्रवासात महत्त्वाची आहे. प्रगती मंद गतीने होत होती, पण त्यात सातत्य होते,” असं दीप्ती म्हणाली.

हेही वाचा – मराठी चित्रपट ‘पाणी’ ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर झाला प्रदर्शित, प्रियांका चोप्राचे आहे खास कनेक्शन

१६ तास इंटरमिटेंट फास्टिंग केले – दीप्ती

दीप्तीला वजन कमी करण्यासाठी तिच्या काही सवयी सोडाव्या लागल्या. “मी ग्लूटेन-फ्री डाएट सुरू केला. मी साखरेचं सेवन करणं पूर्णपणे थांबवलं. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणं बंद केलं. दिवसभरातील १६ तास इंटरमिटेंट फास्टिंग करणे हा माझा मंत्र होता. त्याचबरोबर कॅलरी मोजणे आणि त्यानुसार आहार घेणे, यावर लक्ष दिलं. या प्रवासात कधी तरी एखाद दिवशी मी डाएट सोडून मनसोक्त खायचे,” असं दीप्ती म्हणाली. यासंदर्भात ‘ई-टाइम्स’ने वृत्त दिले आहे.

हेही वाचा – “तेव्हा सरोगसीची फॅशन नव्हती अन् पैसेही नव्हते…”, मूल नसण्याबाबत मराठमोळ्या अश्विनी काळसेकर यांचे वक्तव्य

दीप्ती आधीही वर्कआउट करायची, पण या प्रवासात तिने काही गोष्टी नव्याने रुटीनमध्ये सामील केल्या. दीप्ती पुढे म्हणाली, “मी माझ्या वर्कआउट रुटीनमध्ये एरियल योग, बॉक्सिंग आणि पोहणे या गोष्टींचा समावेश केला. मुख्य म्हणजे अतिप्रमाणात या गोष्टी न करता सातत्य ठेवले. यामुळे फक्त माझ्या शरीरात बदलच झाला नाही, तर माझी एनर्जीदेखील वाढली.”

हेही वाचा – प्रेमामुळे करिअर संपलं, देशही सोडावा लागला; २५ वर्षांनी मुंबईत परतलेली ममता कुलकर्णी म्हणाली, “मी लग्न केलंच नाही”

दीप्तीने तिचा वजन कमी करण्याचा प्रवास सांगितला. काही खास टिप्स शेअर केल्या. त्याचबरोबर ती जर वजन कमी करू शकते तर इतर कोणीही करू शकतं, असंही ती म्हणाली. “जर मी हे करू शकत असेन, तर तुम्हीही करू शकता. तुमचा प्रवास सुरू करण्यासाठी तुम्हाला मदत हवी असल्यास मला मेसेज करा. मला मदत करायला आवडेल,” असं दीप्ती उत्साहाने म्हणाली.