छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ला ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, बबिता, पोपटलाल, डॉ. हंसराज हाथी हे पात्र कायमच चर्चेत असतात. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर गेले आहे. या मालिकेतील दया बेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी ही या मालिकेमुळे घराघरात पोहोचली. दिशा वकानीला घश्याचा कर्करोग झाल्याचे वृत्त समोर येत होते. मात्र काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिने याबाबतचा खुलासा केला होता.
दिशा वकानी ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. या मालिकेमुळे तिला घराघरात प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील तिच्या पात्राला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले. पण काही दिवसांपासून दिशा वकानीला घश्याचा कर्करोग झाल्याचे बोललं जात आहे. यानंतर दिशा वकानीच्या जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात तिने तिच्या विचित्र येणाऱ्या आवाजाबद्दल भाष्य केले होते. तिचा आवाज अशाप्रकारे विचित्र का झाला होता, याबद्दल तिने सांगितले होते.
आणखी वाचा : ‘तारक मेहता…’ मालिकेत परतण्यासाठी दयाबेनने ठेवल्या होत्या ‘या’ अटी, निर्मात्यांनी दिला होता स्पष्ट नकार
दिशा वकानीने २०१० मध्ये एक मुलाखत दिली. या मुलाखतीत दिशा वकानीने तिच्या विचित्र आवाजाबद्दल भाष्य केले होते. यावेळी ती म्हणाली, प्रत्येक वेळी मला आवाजाची पातळी राखणे फार कठीण होते. पण देवाच्या कृपेमुळे कधीही माझ्या आवाजाला कोणतीही हानी झालेली नाही. तसेच मला कधीही घश्याचा कर्करोगाचा सामना करावा लागलेला नाही. मी ११ ते १२ तास सलग शूटींग करत असायची. पण मला कधीही याचा त्रास झालेला नाही.
आणखी वाचा : ‘तारक मेहता…’चे खरे चाहते असाल तर फोटोमधील चंपकलाल यांना ओळखून दाखवाच!
विशेष म्हणजे दिशा वकानीला घश्याचा कर्करोग झाला नव्हता, असे अभिनेता दिलीप जोशी यांनीही स्पष्टीकरण देताना सांगितले होते. दिशा ही लवकरच तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत परतणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. दिशाचा भाऊ मयूर वकानी याने याबद्दल भाष्य केले आहे.
“दिशा ही या शोमध्ये नक्कीच परतणार आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा हा असा एक शो आहे ज्यामध्ये तिने बराच काळ काम केले आहे. ती कधी परतेल आणि कधी काम सुरू करेल याची आम्ही वाट पाहत आहोत”, असे मयूर वकानी म्हणाले. २०१७ मध्ये दिशा मॅटरनिटी लीव्हवर गेली होती. तेव्हापासून ती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेपासून लांब असल्याचे पाहायला मिळाले. यानंतर काही महिन्यांनी दिशाने मालिकेचा कायमचा निरोप घेतला. ती कधी परतणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.