छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सध्या एकाच कारणांमुळे चर्चेत आहे. या मालिकेत ‘मिसेस रोशन सिंह सोढी’ ही भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र निर्माते असित मोदी यांनी हे आरोप फेटाळले आहेत. त्यातच आता जेनिफरच्या एका व्हिडीओने लक्ष वेधून घेतलं आहे.

जेनिफर मिस्त्री ही या प्रकरणानंतर सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे. तिने नुकंतच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात तिने अप्रत्यक्षरित्या निर्माते असित मोदींवर निशाणा साधला आहे.
आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील अभिनेत्रीच्या आरोपांवर निर्मात्यांनी सोडले मौन म्हणाले, “तिच्या बेशिस्तपणामुळे…”

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक

“चुप्पी को मेरी कमजोरी मत समझ, मैं चुप थी क्योंकि सलीका है मुझमें। खुदा गवाह है कि सच क्या है। याद रख, उसके घर में कोई फर्क नहीं तुझमें या मुझसे।” अशी एक शायरी ती या व्हिडीओत सांगताना दिसत आहे. यात ती फारच रागात पाहायला मिळत आहे. जेनिफरने हा व्हिडीओला कॅप्शने देताना “सत्य बाहेर येईल, न्यायाचा विजय होईल” असे म्हटले आहे.

अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने ई-टाईम्सला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत तिने असित मोदींबरोबरच प्रोजेक्ट हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरोधात लैंगिक छळ केल्याबद्दलची तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा : “माझ्या खोलीत ये आपण…” ‘तारक मेहता…’मधील प्रसिद्ध अभिनेत्रीचा निर्मात्यांवर गंभीर आरोप, धक्कादायक खुलासा करत म्हणाली “मी गरोदर असताना…”

“असित मोदीने अनेकदा माझ्याबद्दल लैंगिक टिप्पणी केली आहे. एकदा तर त्यांनी सर्वांसमोर माझ्यावर लैंगिक टिप्पणी करत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पण तिथे असलेल्या सहकलाकारांनी या गोष्टी सांभाळून घेतल्या होत्या. एकदा त्याने मला ‘सेक्सी’ म्हटले होते आणि माझे गालही ओढले होते. असित मोदी माझ्यावर अनेक लैंगिक टिप्पणी करायचे. पूर्वी मी नोकरी जाण्याच्या भीतीने त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे, पण आता मला हे सहन होत नाही”, असे जेनिफरने म्हटले होते.

दरम्यान या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी जेनिफरने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.
“आम्ही याबद्दल कायदेशीर कारवाई करु. कारण ती माझी आणि शो दोघांचीही बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. तिचे सर्व आरोप निराधार आहेत”, असे असित कुमार मोदी यांनी म्हटले आहे.

Story img Loader