छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर गेले आहे. गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेल्या या मालिकेतील कलाकार आता मालिका सोडू लागले आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नुकतंच याचे उत्तर समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी ही मालिका सोडणारे दिग्दर्शक मालव राजदा यांनी याबाबत भाष्य केले आहे.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी मालिका आहे. या मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन ही जोडी तर घराघरात प्रसिद्ध आहे. या मालिकेत दया बेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीने २०१७ मध्ये मालिकेला रामराम केला. त्यानंतर भव्य गांधी, राज अनाडकत, शैलेश लोढा, नेहा मेहता अशा अनेक कलाकारांनी मालिकेतून एक्झिट घेतली. त्यातच आता मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा यांनीही मालिकेला रामराम केला. यानंतर आता त्यांनी गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेल्या या मालिकेतील कलाकार आता मालिका सोडू लागले आहेत याबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : अक्षय केळकर ‘बिग बॉस’चा विजेता ठरल्यानंतर अपूर्वा नेमळेकरची पहिली पोस्ट, म्हणाली…
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या सब टीव्हीवरील लोकप्रिय मालिकेला एक एक करून अनेक कलाकार राम राम करत आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ आणि मालव राजदा यांच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये वाद झाला. त्यानंतर राजदांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला, असं बोललं जात आहे. मात्र मालव राजदांनी बीबीसी मराठीशी बोलताना हे वृत्त फेटाळलं आहे.
“मी तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली आहे. गेल्या १४ वर्षांपासून मी या मालिकेत काम करत आहे. त्यामुळे एक कम्फर्ट झोन तयार झाला आहे. मला असं वाटतंय की, रचनात्मक रुपात पुढे जाण्यासाठी मालिका सोडून स्वत:ला आव्हान दिलं पाहिजे” असंही मालव राजदा यांनी म्हटले.
आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : “आज या किरण्याला हरण्याच्या…” किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतूनच अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. या मालिकेमुळे ‘दयाबेन’ची भूमिका साकारणारी दिशा वकानी व ‘तारक मेहता’च्या भूमिकेत दिसणारे शैलेश लोढा घराघरात पोहोचले होते. वैयक्तिक कारणामुळे या दोघांनीही मालिका सोडली. त्यानंतर आता या मालिकेच्या दिग्दर्शक मालव राजदांनीही ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ला रामराम ठोकला आहे.