छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेत दया बेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७ पासून मालिकेपासून लांब आहे. आता दयाबेनचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. त्यात तिने तिच्या लेकाची झलक दाखवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या अनेक वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर गेले आहे. या मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन ही जोडी तर घराघरात प्रसिद्ध ठरली. नुकतंच सोशल मीडियावर दिशाचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. दिशा वकानीच्या एका चाहत्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : ‘तारक मेहता…’ मालिकेत परतण्यासाठी दयाबेन सज्ज, निर्माते म्हणाले “आम्ही योग्य वेळेची…”

दिशा वकानीचा हा व्हिडीओ महाशिवरात्रीचा आहे. या व्हिडीओत दिशा, दिशाचे पती मयूर, तिची मुलगी शिवलिंगाची पूजा करत आहे. याबरोबरच दिशा तिच्या लेकाला मांडीवर घेऊन बसली आहे. यावेळी दिशाच्या मुलाची पहिली झलकही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत तिचे संपूर्ण कुटुंबच शिवलिंगाची पूजा करत असल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा : Video : धक्काबुक्कीच्या घटनेनंतर पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आला सोनू निगम, तब्येतीबाबत माहिती देत म्हणाला…

दिशाचा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी हे भावूक झाले आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून तिला मालिकेत परतण्याची विनंती केली आहे. तर काहींनी तिच्या मुलाचे नाव काय, असा प्रश्न विचारला आहे.

दरम्यान २०१७ मध्ये दिशा प्रसूती रजेवर गेली होती. तेव्हापासून ती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेपासून लांब असल्याचे पाहायला मिळाले. यानंतर काही महिन्यांनी दिशाने मालिकेचा कायमचा निरोप घेतला. या मालिकेच्या निर्मात्यांनी तिच्या जागी नवी अभिनेत्री शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यात ते अयशस्वी ठरले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah dayaben aka disha vakani mahashivratri pooja video viral nrp