‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेद्वारे अभिनेत्री मुनमुन दत्ता घराघरांत पोहोचली. ‘तारक मेहता’ मालिकेतील ‘बबीता’ या पात्रामुळे कलाविश्वात तिला एक नवी ओळख मिळाली. मुनमुन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अभिनेत्री सध्या तिच्या आईसह दुबई फिरण्यासाठी गेली आहे. दुबई दौऱ्यादरम्यान अभिनेत्रीने अबू धाबीयेथील मशिदीबाहेर काही फोटो काढून ते सोशल मीडियावर शेअर केले, यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा : हिरवी साडी, पारंपारिक दागिने, कुरळे केस अन्…, चंद्रमुखी २ मधील कंगना रणौतचा पहिला लूक आला समोर
मुनमुन दत्ताने अबू धाबी येथील शेख झायेद मशिदीतील फोटो शेअर केल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अभिनेत्रीने हे फोटो शेअर केल्यावर अवघ्या काही तासांत ही पोस्ट व्हायरल होऊन यावर नेटकऱ्यांच्या हजारो प्रतिक्रिया आल्या आहेत. मुनमुनने शेअर केलेल्या फोटोंवर अनेकांनी “जय श्री राम” अशा कमेंट केल्या आहेत.
हेही वाचा : “हसली, रडली अन् शेवटच्या रांगेत बसून…”, रणवीर सिंहने सांगितला बायको दीपिकासह ‘रॉकी और रानी’ पाहतानाचा किस्सा
एका युजरने, “हिंदू आहेस मंदिरात जा, मशिदीत नाही.” अशी कमेंट केली असून दुसऱ्या एका युजरने, “या फोटोमुळे मी तुला अनफॉलो करत आहे.” काही जणांनी “मुनमुन तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती”, “तुला आम्ही ब्लॉक करणार” अशाप्रकारच्या असंख्य प्रतिक्रिया या फोटोंवर दिल्या आहेत. सोशल मीडियावर मुनमुन दत्ताच्या चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु हे फोटो पाहून तिचे चाहते काहीसे नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, हा फोटो पोस्ट करताना मुनमुनने कॅप्शनमध्ये, “कोणीही माझ्याबद्दल काही विचार करण्याआधी मी अभिमानाने हिंदू आहे. दुसऱ्या देशात फिरताना तेथील संस्कृतीचा आदर राखण्याचा मी प्रयत्न करते. त्याचप्रमाणे इतर धर्मातील लोकांनी माझ्या धर्माचा आदर करावा अशी अपेक्षा करते.” असे लिहिले होते. परंतु, त्यानंतरही तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.