Gurucharan Singh Debt: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेता गुरुचरण सिंग दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झाला होता. तो तब्बल २६ दिवसांनी परत आला होता. घरी परतल्यानंतर काही दिवसांनी तो मुंबईत आला असून काम शोधत आहे. त्याने घर सोडलं तेव्हाही तो कर्जामुळेच कुठेतरी निघून गेल्याची बातमी आली होती, पण त्याच्या कुटुंबियांना याची काहीही कल्पना नव्हती, आता खुद्द गुरुचरणने काही खुलासे केले आहेत.

गुरुचरण सिंगवर १.२ कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि ते फेडण्यासाठी काम हवंय. गेल्या एका महिन्यापासून मुंबईत काम मिळवण्यासाठी फिरत असल्याचं अभिनेत्याने सांगितलं. “मी एका महिन्यापासून कामाच्या शोधात मुंबईत आहे. मला वाटतं की लोक माझ्यावर प्रेम करतात आणि त्यांना मला स्क्रीनवर पाहायचं आहे. मला माझ्या खर्चासाठी, माझ्या आईची काळजी घेण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी पैसे कमवायचे आहेत. मला काहीतरी चांगलं काम करून माझी दुसरी इनिंग सुरू करायची आहे. मला आता पैशांची खूप गरज आहे कारण मला ईएमआय व क्रेडिट कार्डची बिलं देखील भरावी लागतात. मला पैशांची गरज आहे, काही चांगले लोक आहेत जे मला उसने पैसे देतात. पण आता मला काम हवंय, कारण मला माझ्या वृद्ध आई-वडिलांची काळजी घ्यायची आहे,” असं गुरुचरण सिंग सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

अभिषेक बच्चनने खरंच ऐश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिलीय? ‘त्या’ व्हायरल विधानामागचं सत्य काय?

३४ दिवसांपासून जेवण सोडलंय

एका महिन्यापेक्षा जास्त काळापासून जेवणं सोडलं असून फक्त लिक्विड डाएट घेत असल्याचं गुरुचरणने सांगितलं. “गेल्या ३४ दिवसांपासून मी जेवण बंद केलंय. मी दूध, चहा आणि नारळपाणी एवढंच पितोय. गेल्या चार वर्षांत मी फक्त अपयशच पाहिलं आहे. मी वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला पण मला कशातच यश मिळालं नाही. आता मी थकलो आहे आणि आता मला पैसे कमवायचे आहेत,” असं गुरुचरण सिंग म्हणाला.

Gurucharan singh family
गुरुचरण सिंग व त्याचे आई-वडील (फोटो -इन्स्टाग्राम)

१.२ कोटी रुपयांचे कर्ज

यावेळी गुरुचरण सिंगने त्याच्यावरील कर्जाबद्दल सांगितलं. “माझ्यावर खूप कर्ज आहे. मला बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्यांचे ६० लाख रुपयांचे कर्ज फेडायचे आहे. याशिवाय माझ्या ओळखीच्या काही लोकांनी मला पैसे दिले आहेत आणि त्यांचे कर्जही मला फेडायचे आहे. माझ्यावर एकूण १.२ कोटी रुपयांचे कर्ज आहे,” असं गुरुचरण सिंग म्हणाला.

तृप्ती डिमरीचा सुपरफ्लॉप चित्रपट सहा वर्षांनी पुन्हा प्रदर्शित, दोन दिवसांत कमावले…

गुरुचरण सिंग घरातून धार्मिक प्रवासासाठी निघून गेला होता. कर्ज न फेडण्याचा कोणताही विचार नाही. सध्या कर्ज घेतलंय ते प्रत्येक ईएमआय भरत असल्याचं त्याने यापूर्वीच्या मुलाखतीत सांगितलं होतं.

Story img Loader