गेल्या कित्येक वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. आजही मनोरंजनासाठी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका घरोघरी आवर्जुन पाहिली जाते. याच मालिकेतील तुम्हाला सोनू भिडे आठवतेय का? अभिनेत्री झील मेहताने सोनू भिडेची भूमिका साकारली होती. हिच सोनू म्हणजे झील लवकरच बोहल्यावर चढणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील सोनू आता मोठी झाली आहे. झील मेहताने अभिनय क्षेत्र सोडल्यापासून ती व्यवसाय करत आहे. लवकरच झील आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवणार आहे.

हेही वाचा – अमिताभ बच्चन होते बॅकबेंचर, शाळेच्या आठवणी सांगत म्हणाले, “मागे बसून मी आणि माझे मित्र…”

‘ई-टाइम्स’च्या वृत्तानुसार, अभिनेत्री झील मेहता स्वतःच्या लग्नासाठी खूप उत्सुक आहे. तसंच आता लग्नाची तारीख देखील ठरली आहे. २८ डिसेंबरला झील बॉयफ्रेंड आणि कंटेंट क्रिएटर आदित्य दुबेबरोबर सात फेरे घेणार आहे.

लग्नाबाबत झील मेहता म्हणाली की, लग्न पारंपरिक पद्धतीने होणार आहे. ज्यामध्ये समकालीन वस्तूंचा वापर केला जाणार आहे. लग्न हे माझ्यासाठी सर्वात मोठं साहस आहे. त्यानंतर झीलला विचारलं की, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची टीम लग्नाला येणार आहे का? तर अभिनेत्री म्हणाली, “माझं लग्न फक्त जवळचे मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत होणार आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची टीम रिसेप्शनला येणार आहे.”

हेही वाचा – ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम स्वप्नील राजशेखर खरं आडनाव का लावत नाहीत? ‘राजशेखर’ नावामागे आहे रंजक गोष्ट, वाचा…

हेही वाचा – “मुंबईत दोन दिवसांचे कपडे घेऊन आले होते अन्…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अपूर्वा गोरेने ईशा पात्राच्या ऑडिशनचा सांगितला मजेशीर किस्सा

दरम्यान, झीलने जानेवारी २०२४मध्ये आदित्य दुबेबरोबर साखरपुडा केला होता. अलीकडेच घराचा सुंदर व्हिडीओ तिने शेअर केला होता. ज्यामध्ये लग्नाची तयारी पाहायला मिळाली होती. झील आणि आदित्य लग्नासाठी सध्या डान्स प्रॅक्टिस करत आहेत.

झीलच मेहताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अभिनय क्षेत्र सोडून ती मेकअप आर्टिस्ट झाली होती. त्यानंतर आता ती सेफ स्टूडंट हाउसिंग नावाचा स्वतःचा व्यवसाय करत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना राहण्याची व भोजनाची सोय केली जाते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah fame jheel mehta marriage on 28 december pps