‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले आहेत. मालिका सोडलेल्या जेनिफर मिस्त्री, मोनिका भदौरिया यांसारख्या कलाकारांनी असित कुमार मोदींवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर ‘तारक मेहता…’मध्ये रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्रिया अहुजानेही या प्रकरणी भाष्य करत निर्मात्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती. आा प्रियाने ‘तारक मेहता…’च्या निर्मात्यांवर पुन्हा एक गंभीर आरोप केला आहे.
हेही वाचा- वयात अंतर, पत्नीला PCOD चा त्रास अन् आता जुळ्या बाळांचा जन्म; अभिनेता म्हणाला, “डिलिव्हरी सी-सेक्शन झाली, पण…”
प्रियाच्या म्हणण्यानुसार, “असित मोदी कलाकारांना त्यांच्यासमोर कामासाठी भीक मागायला लावतात. त्यांना तसे करायला आवडतं. मला कपिल शर्मा शो किंवा कौन बनेगा करोडपतीमध्ये नेण्यात आले नाही. त्यावेळी मला खूप वाईट वाटलं पण याचा माझ्या कामावर परिणाम होईल या विचाराने मी गप्प राहिले.”
प्रिया ही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे चे माजी संचालक मालव राजदा यांची पत्नी आहे. खुद्द मालव यांनी मालिकेच्या निर्मात्यांनी फी न भरल्याचा आरोप करत मालिका सोडली होती. जेनिफर मिस्त्रीनेही सोहेल रमानी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्यावर आरोप करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिने असित मोदींवरही गंभीर आरोप केले आहेत.