Taarak Mehta ka Ooltah Chashmah fame Jheel Mehta got Married : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत सोनू भिडे ही भूमिका साकारून लोकप्रिय झालेलली अभिनेत्री झील मेहता लग्नबंधनात अडकली आहे. झीलने तिचा बॉयफ्रेंड आदित्य दुबेबरोबर लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नातील एक सुंदर व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ झील व आदित्य यांच्या लग्नातील काही क्षण पाहायला मिळत आहे.

२७ वर्षांच्या झील मेहताने २८ डिसेंबरला आदित्य दुबेशी लग्न केलं. हिंदू रितीरिवाजानुसार या जोडप्याचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. लग्नासाठी झीलने लाल रंगाचा लेहेंगा निवडला, तर आयव्हरी रंगाच्या शेरवानीमध्ये आदित्य छान दिसतोय. व्हिडीओत झीलची एंट्री पाहायला मिळते, झीलला येताना पाहून आदित्य भावुक होतो; झील त्याचे अश्रू पुसते.

हेही वाचा – २८ वर्षीय अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, ‘या’ मालिकेत साकारलेली मुख्य भूमिका; शाही सोहळ्याचे फोटो चर्चेत

पाहा व्हिडीओ –

झीलच्या लग्नाच्या तीन दिवसांनंतर फोटोग्राफी पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये झील व आदित्यला टॅग केलं आहे. या व्हिडीओवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करून दोघांना नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.

तारक मेहता मालिकेत सोनूच्या वडिलांची म्हणजेच आत्माराम भिडे ही भूमिका साकारणाऱ्या मंदार चांदवडकरने तिला शुभेच्छा दिल्या आहेत. “अभिनंदन झील उर्फ ​​सोनू.. मला माफ कर, मी तुझ्या आयुष्यातील इतक्या सुंदर क्षणाचा साक्षीदार होऊ शकलो नाही.. शूटिंग करत होतो, पण माझ्या शुभेच्छा सदैव तुम्हा दोघांबरोबर आहेत… तुमचे पुढील वैवाहिक आयुष्य आनंददायी जावो,” अशी कमेंट त्याने केली आहे.

mandar Chandwadkar comment on jheel mehta wedding video
मंदार चांदवडकरने माफी मागत दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

लग्नाच्या व्हिडीओमध्ये झील म्हणाली की, तिला यापूर्वी कधीही इतका आनंद झाला नव्हता. ती इतकी आनंदी आहे की तिला कसं व्यक्त व्हावं ते कळत नाहीये.

हेही वाचा – “काय ते थर्ड क्लास…”, गश्मीर महाजनीचं Bigg Boss 18 बद्दल प्रश्न विचारणाऱ्याला उत्तर; म्हणाला, “अहो तुम्ही मराठी सिनेमा…”

झीलने जानेवारी २०२४ मध्ये आदित्य दुबेशी साखरपुडा केला होता. त्यानंतर ते २८ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकले. झील मेहता हिने तारक मेहता मालिका सोडल्यानंतर अभिनयक्षेत्राही सोडलं. ती मेकअप आर्टिस्ट झाली होती. त्यानंतर ती व्यवसाय क्षेत्राकडे वळली. तिचा सेफ स्टूडंट हाउसिंग नावाचा स्वतःचा व्यवसाय आहे. तर तिचा पती आदित्य दुबेबद्दल बोलायचं झाल्यास तो गेमिंग स्टुडिओच्या व्यवसायात आहेत. त्याचबरोबर तो व्हिडीओ कंटेंट क्रिएशनदेखील करतो.

Story img Loader