Taarak Mehta ka Ooltah Chashmah fame Jheel Mehta : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत सोनू ही भूमिका करून लोकप्रिय झालेली अभिनेत्री झील मेहता सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. झीलने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती नोंदणी पद्धतीने लग्न करताना दिसत आहे. अडीच महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न करणाऱ्या झीलच्या या व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

झीलने तिचा बॉयफ्रेंड आदित्य दुबेबरोबर २८ डिसेंबर २०२४ रोजी लग्नगाठ बांधली. हिंदू रितीरिवाजानुसार या जोडप्याचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. या दोघांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर आता झीलने आदित्यशी नोंदणी पद्धतीने लग्न केलं आहे.

झील मेहताने आदित्य दुबेबरोबरच्या तिच्या नोंदणी पद्धतीने केलेल्या लग्नाची झलक शेअर केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकलेल्या या जोडप्याने १७ फेब्रुवारी २०२५ रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. झील आणि आदित्य लग्नात आयव्हरी रंगाच्या कपड्यांमध्ये खूपच सुंदर दिसत होते. कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत त्यांनी लग्नाची नोंदणी केली.

फायनली लिगली मॅरिड
१७•०२•२५ असं कॅप्शन झीलने या व्हिडीओला दिलं आहे.

झीलने शेअर केलेला व्हिडीओ

झीलच्या या व्हिडीओवर कमेंट्स करून काही चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी झीलचं लग्न कधी संपेल, अशा कमेंट्स केल्या आहेत.

झीलने जानेवारी २०२४ मध्ये आदित्य दुबेशी साखरपुडा केला होता. त्यानंतर ते २८ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकले. झील मेहता हिने तारक मेहता मालिका सोडल्यानंतर अभिनयक्षेत्रही सोडलं. तिने काही काळ मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलं. त्यानंतर तिने व्यवसाय करायचं ठरवलं. तिचा सेफ स्टूडंट हाउसिंग नावाचा स्वतःचा व्यवसाय आहे. तर तिचा पती आदित्य दुबे गेमिंग स्टुडिओच्या व्यवसायात आहेत. त्याचबरोबर तो व्हिडीओ कंटेंट क्रिएशनदेखील करतो.

Story img Loader