‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी, प्रोडक्शन हेड सोहेल रमानी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादात सापडले आहेत. मालिका सोडलेल्या काही कलाकारांनी त्यांच्यावर गैरवर्तनाचे गंभीर आरोप केले आहेत. मिसेस रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारी जेनिफर मिस्त्री सातत्याने मालिकेच्या निर्मांत्यांवर आरोप करीत आहे. त्यानंतर आता मालिकेत बावरीची भूमिका साकारणाऱ्या मोनिका भदोरियाने सुद्धा निर्मात्यांवर टीका केली आहे.

हेही वाचा : “घटस्फोट कधी घेतलास?” कार्तिक-कियाराचा ‘तो’ फोटो पाहून नेटकरी गोंधळले; अभिनेत्रीने डिलीट केली इन्स्टाग्राम पोस्ट

Salman Khan denies association with The Great Indian Kapil Show
“कुठे थांबायचं याचा विसर…”, भावना दुखावल्याने कपिल शर्माच्या शोमुळे सलमान खानला कायदेशीर नोटीस? अभिनेत्याने दिलं स्पष्टीकरण
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”
DY Chandrachud on euthanasia case
Ex CJI DY Chandrachud: शेवटच्या दिवशी न्या. चंद्रचूड यांचा महत्त्वाचा निकाल; मुलाच्या इच्छामरणाची मागणी करणाऱ्या पालकांना दिला दिलासा
CCI probe finds Zomato, Swiggy violating competition norms
स्पर्धा आयोगाकडून चौकशीवर अंतिम निवाडा आला नसल्याचा दावा

मोनिका भदोरियाने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटवर काम करताना आलेल्या अडचणींचा खुलासा ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. या वेळी मोनिकाला दया बेन म्हणजेच दिशा वाकानी शोमध्ये पुन्हा का येत नाही यामागचे नेमके कारण काय, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मोनिका म्हणाली, “मी त्या गोष्टीविषयी काहीच बोलणार नाही. कदाचित तिलाही असाच काहीसा अनुभव आला असावा कारण, तुम्हाला चांगले मानधन देऊनही तुमची कार्यक्रमात पुन्हा येण्याची इच्छा नसेल तर, यामागे दुसरे काय कारण असू शकते?”

हेही वाचा : ‘बिग बॉस ओटीटी २’चा प्रोमो झाला प्रदर्शित; यंदा प्रेक्षक असणार स्पर्धकांचे ‘बॉस’, केव्हा आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या

मोनिका पुढे म्हणाली, “याउलट मला माझ्या मेहनतीचा पैसा मिळवण्यासाठी वर्षभर स्ट्रगल करावा लागला. जेव्हा मी त्यांना म्हणाले मी CINTAA कडे तुमची तक्रार करेन तेव्हा मला माझे मानधन देण्यात आले. सगळ्यांना त्यांनी हीच वागणूक दिली होती. “तारक मेहता…” च्या संपूर्ण प्रवासात मला ठरवून दिलेले मानधन केव्हाच दिले गेले नाही.”

हेही वाचा : “तुझ्याकडे काय आहे जे इतर अभिनेत्यांकडे नाही?” फिल्मी स्टाईल उत्तर देत शाहरुख खान म्हणाला, “मेरे पास…”

दरम्यान, मोनिका भदोरियाच्या आधी ‘तारक मेहता…’मधील अनेक कलाकारांनी मालिकेचे निर्माते असित मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. जेनिफर मिस्त्रीने असित मोदींसह, सोहेल रमानी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.