‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा कार्यक्रम आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाची जोरदार चर्चा रंगत आहे. मालिकेतील काही अभिनेत्रींनी ‘तारक मेहता…’च्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शिवाय यामध्ये बावरी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका भदौरियानेही बरेच धक्कादायक खुलासे केले. आता तिने पुन्हा एकदा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’बाबत भाष्य केलं आहे. मोनिकाने सांगितलेला अनुभव ऐकून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

‘इटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोनिकाने वजन कमी करण्याबाबत सांगतिलं. ती म्हणाली, “‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे प्रोजेक्ट हेड साहिल रमानी यांच्याद्वारे मला एक कॉल आला होता. त्यांना माझ्याशी बोलायचं होतं म्हणून मला साहिल यांच्या ऑफिसमध्ये बोलावण्यात आलं. तेव्हा ते स्वतः तिथे नव्हते. मात्र त्यांच्या ऑफिसमध्ये अकाऊंट्स विभागात काम करणाऱ्या एका व्यक्तीने मला पाहिलं. ती व्यक्ती मला म्हणाली की, तुमच्या वाढत्या वजनाबाबत सांगण्यासाठी तुम्हाला इथे बोलावण्यात आलं आहे”.

आणखी वाचा – “वडिलांना हे क्षेत्र मान्य नव्हतं आणि…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “आमच्या तीन भावडांपैकी…”

अकाऊंट्स विभागात काम करणाऱ्या त्या व्यक्तीने मोनिकाला तिच्या वाढत्या वजनावरुन हिणावलं. मोनिका म्हणते, “स्वतःला बघ. असं वाटतं की, तू गरोदर आहेस. तू गरोदर आहेस का? असं मी प्रॉडक्शन टीमलाही विचारलं. पण तुझं अजून लग्नच झालं नाही असं त्यांनी मला सांगितलं. ऑफिसमध्ये अकाऊंट्स विभागात काम करणाऱ्या त्या व्यक्तीचं माझ्याबाबत असलेलं मत ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. तितक्यात साहिलही तिथे आले. त्यांनीही २० दिवसांमध्ये वजन कमी करण्याचा मला सल्ला दिला”.

आणखी वाचा – दोन विवाहित अभिनेत्यांबरोबर होतं श्रीदेवी यांचं अफेअर, दोघांच्याही पत्नींना कळलं अन्…

मोनिकाने वजन कमी करण्यासाठी साहिल यांच्याकडे आर्थिक खर्च मागितला. तो देण्यासाही तिला नकार देण्यात आला. शिवाय तिने २० दिवसांमध्ये वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. पण यादरम्यान वजन कमी करण्याच्या धावपळीत मोनिका आजारी पडली. तिला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. काही महिने तिला चित्रीकरणासाठीही बोलावलं नाही. हे सारं काही त्रास देण्यासाठी करण्यात आलं असल्याचा आरोप मोनिकाने केला आहे. शिवाय साहिल आई-वडिलांच्या नावाने अपशब्द वापरत असल्याचंही मोनिकाने सांगितलं. महिला कलाकारांचा तो सन्मान करत नसल्याचंही मोनिकाचं म्हणणं आहे.