‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेची लोकप्रियता आजही कायम आहे. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक ही मालिका आवर्जुन पाहतात. इतकंच नव्हे तर या मालिकेचे जुने एपिसोडही आज पाहिले जातात. मालिकेमधील कलाकारांची लोकप्रियता तर प्रचंड आहे. म्हणूनच की काय ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजद्वारे एक फोटो शेअर करण्यात आला आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या पेजवर बऱ्याच लोकांची गर्दी असलेला फोटो पोस्ट करण्यात आला. गर्दी असलेल्या या फोटोमध्ये कोणी सायकल तर कोणी ओझी वाहताना दिसत आहे. या गर्दीमध्येच मालिकेमधील काही पात्र दडलेले आहेत.
या गर्दीमध्ये तुम्ही आमच्या गोकुळधाममधील रहिवाश्यांना शोधू शकता का पाहा? असं फोटो पोस्ट करत सांगण्यात आलं आहे. गर्दीमध्ये दडलेले कलाकारांचे चेहरे शोधणं अगदी कठीण आहे. पण हा फोटो जवळून पाहिलं की कोणते कलाकार यामध्ये दिसतात हे लक्षात येतं.
आणखी वाचा – सर्जरी झाल्यामुळे मालिकेमधून घेतला ब्रेक, आता ‘आई कुठे काय करते’मध्ये पुन्हा परतणार अरुंधती, पुढे काय घडणार?
या फोटोमध्ये जेठालाल, अय्यर, अब्दुल, आत्मराम भिडे, चंपकलाल दिसत आहेत. खरं तर या पात्रांचे चेहरे या फोटोमध्ये एडिट करण्यात आलं आहेत. तसेच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या पेजवर फोटो शेअर करताच अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून याचं उत्तर दिलं आहे.