‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या सेटवर मोठा वाद झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. जेठालाल गडाची भूमिका करणारे अभिनेते दिलीप जोशी यांचं शोचे निर्माते असित मोदी यांच्याशी कडाक्याचे भांडण झाले. दिलीप यांनी रागात असित यांची कॉलर धरली, असे वृत्त न्यूज १८ ने दिले होते. यावर शोमध्ये आत्माराम भिडे हे पात्र साकारणारा मंदार चांदवडकर याने प्रतिक्रिया दिली आहे.
दिलीप जोशी यांनी काही दिवसांची सुट्टी मागितली होती. दिलीप जोशी आपल्या सुट्ट्यांबद्दल बोलण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा असित मोदी यांनी संभाषण टाळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे दिलीप चिडले. असित हे दिलीप जोशी यांच्याकडे दुर्लक्ष करून कुश शाहला भेटायला गेले, त्यामुळे दिलीप यांना अपमानास्पद वाटलं. कुशने नुकतीच मालिका सोडली आहे. भांडण इतकं कडाक्याचं झालं की दिलीप जोशी यांनी असित मोदींची कॉलर देखील धरली होती. अशी बातमी समोर आली होती. ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना मंदार चांदवडकरने हे वृत्त फेटाळले आहे.
हेही वाचा – कश्मीरा शाहचा अपघात कसा झाला, आता प्रकृती कशी आहे? तिची नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली…
मंदार चांदवडकर काय म्हणाला?
मंदारने असं काहीच घडलं नसल्याचं म्हटलं आहे. “काय फालतूपणा आहे हा? या अफवा कोणी पसरवल्या? आम्ही सर्वजण अगदी शांततेत आणि आनंदाने शूटिंग करत आहोत,” असं मंदार म्हणाला.
हेही वाचा – “बॉलीवूड कलाकार दारूची…”, दिलजीत दोसांझची ‘त्या’ नोटीसनंतर टीका; सरकारला आव्हान देत म्हणाला…
अमित भट्ट यांनीही अशी कोणतीच गोष्ट सेटवर घडल्याचं नाकारलं. या निव्वळ अफवा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दिलीप जोशी व असित मोदी यांचं भांडण झालं नसून सगळे आनंदाने मालिकेचं शूटिंग करत आहेत.