‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर गेले आहे. या मालिकेतील जेठालाल हे पात्र प्रचंड लोकप्रिय झालं. हे पात्र सकारात असलेल्या दिलीप जोशी यांचा जीव धोक्यात असल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. आता खुद्द दिलीप जोशी यांनीच यावर प्रतिक्रिया दिली आहे.
दिलीप जोशी यांच्या घराभोवती तब्बल गुंड घुटमळताना आढळले होते. मीडिया रीपोर्टनुसार त्या गुंडांच्या हातात हत्यारं असल्याचंही स्पष्ट झालं. एका अनोळख्या व्यक्तीने ही बातमी नागपूर पोलिस कंट्रोलला दिल्यावर पोलिसही सावध झाले आणि त्यांनी दिलीप दोषी यांना सांभाळून राहायचा सल्ला दिला होता. त्यानंतर या प्रकरणाबाबत भरपूर चर्चा रंगल्या होत्या. आता अखेर दिलीप जोशी यांनी भाष्य करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
दिलीप जोशी म्हणाले, “ही बातमी खोटी आहे. असं काहीही झालं नाही. ज्याने ही चुकीची बातमी पसरवली त्याचे भलं होवो. माझी चौकशी विचारायला अनेकांचे फोन आले. अनेक जुने मित्र आणि कुटुंबीयांचा त्यात सहभाग होता. अनेकांना माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी वाटली. लोक माझ्यावर इतकं प्रेम करतात हे पाहून मला खूप आनंद झाला.”
पुढे ते म्हणाले, “याची सुरुवात कुठे आणि कशी झाली मला माहित नाही पण गेले दोन दिवस याची चर्चा रंगली आहे. मी जर कोणतही चुकीचं काम केलं नाही तर मला घाबरायची गरजच काय? या बातमीत काहीही तथ्य नाही.” आता त्यांचं बोलणं चर्चेत आलं आहे.