Veteran Actress Tabassum passed away : ज्येष्ठ अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. १८ नोव्हेंबर रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तबस्सुम यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्या रुग्णालयातून घरी परतल्या होत्या. मात्र शुक्रवारी पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांना दोनदा हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं, अशी माहिती त्यांचा मुलगा होशांगने दिली.

तबस्सूम यांनी १९७२ ते १९९३ पर्यंत दूरदर्शनवरील ‘फुल खिले हैं गुलशन गुलशन’ या सेलिब्रिटी चॅट शोच्या होस्ट म्हणून काम केलं होतं. त्यांनी २०१४ मध्ये ‘रेडिफ डॉट कॉम’ला एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी एक आठवण सांगितली होती. अमिताभ बच्चन कधीही शोसाठी टेलिव्हिजन स्टुडिओमध्ये यायचे नाहीत आणि त्याऐवजी ते तबस्सूम यांना चित्रपटांच्या सेटवर बोलवायचे. तेव्हा अमिताभ यांनी त्यांचा जीव कसा वाचवला होता, तो प्रसंग त्यांनी सांगितला होता.

aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
uttar pradesh jhanshi hospital fire
Jhansi Fire: झाशीमध्ये हाहाकार! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू, योगी आदित्यनाथांकडून शोक व्यक्त
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
Amitabh Bachchan share school days memories in kaun Banega crorepati season 16
अमिताभ बच्चन होते बॅकबेंचर, शाळेच्या आठवणी सांगत म्हणाले, “मागे बसून मी आणि माझे मित्र…”
Amitabh Bachchan
अभिषेक बच्चनचे निम्रत कौरशी अफेअर असल्याच्या चर्चा; अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्रीला लिहिलेले पत्र झाले व्हायरल
amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”

हेही वाचा – “निधनानंतर दोन दिवस…” तबस्सूम यांच्या शेवटच्या इच्छेबाबत मुलाचा खुलासा

त्या म्हणाल्या होत्या, “मी तुम्हाला अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा एक प्रसंग सांगेन, ज्याचा ‘फुल खिले’शी काहीही संबंध नाही… मी त्यांच्याबरोबर आणि कल्याणजी-आनंदजींसह भारतात आणि परदेशात अनेक लाइव्ह शो केले आहेत. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात एक घटना घडली होती. तेव्हा माझा पाय फ्रॅक्चर झाल्याने मी व्हीलचेअरवर बसून शो होस्ट करत होते. त्यावेळी तिथे अचानक आग लागली आणि चेंगराचेंगरी झाली. मी व्हीलचेअर होते आणि मदतीसाठी ओरडत होते, पण कोणीच मदत करण्यासाठी पुढे आलं नाही. सर्वजण आपापला जीव वाचवण्यासाठी धावत होते. तेवढ्यात अमितजी आले. त्यांनी मला तिथून सुरक्षित ठिकाणी नेले. आज मी त्याच्यामुळेच जिवंत आहे,” असं तबस्सुम यांनी सांगितलं होतं.

हेही वाचा – ज्येष्ठ अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे निधन

शनिवारी तबस्सुम यांचा मुलगा होशांग गोविल याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अभिनेत्रीच्या मृत्यूची पुष्टी केली आणि सांगितलं, “शुक्रवारी रात्री ८.४० वाजताच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने तिचं निधन झाले. ती पूर्णपणे बरी होती. आम्ही आमच्या शोसाठी १० दिवसांपूर्वी शूटिंग केलं होतं आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा शूट करणार होतो, पण अचानक तिची प्रकृती बिघडली आणि त्यातच तिचं निधन झालं.”