SonPari Reunion: ९० च्या दशकातील मुलांनी ‘सोनपरी’ ही मालिका नक्कीच पाहिली असेलच. त्या काळी ही लहान मुलांची आवडती मालिका होती. ही मालिका लागली की मुलं टीव्हीसमोरून हटायची नाहीत. ही मालिका बंद होऊन बरीच वर्षे झाली आहेत. या मालिकेतील लहान कलाकार आता बरेच मोठे झाले आहेत आणि त्यांना ओळखणंही कठीण झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सोनपरी’मध्ये फ्रूटीची भूमिका अभिनेत्री तन्वी हेगडे हिने साकारली होती. तेव्हाची लहानगी फ्रुटी आता मोठी झाली असून पूर्णपणे बदलली आहे. तन्वी आता ३२ वर्षांची आहे. २४ वर्षांनी फ्रूटी, अल्टू अंकल आणि सोनपरी यांच्या यांच्या रियुनियनचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये तन्वी तिच्या सहकलाकार मराठमोळ्या मृणाल कुलकर्णी आणि अशोक लोखंडे यांच्याबरोबर दिसत आहे.

अरबाज पटेलबद्दल ‘ती’ पोस्ट, आता त्याच्या गर्लफ्रेंडने थेट बॉलीवूड अभिनेत्यासह शेअर केला फोटो, कॅप्शनने वेधले लक्ष

पहिल्या फोटोत तन्वीने एक नवीन आणि जुना फोटो कोलाज करून पोस्ट केला आहे ज्यामध्ये ते तिघेही सारखीच पोज देताना दिसत आहेत. हे फोटो पाहून फक्त या तिघांच्याच नाही तर प्रेक्षकांच्याही जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. दुसऱ्या एका फोटोत तन्वी आणि मृणाल एकत्र पोज देताना दिसत आहेत. तर आणखी एका फोटोत अशोक लोखंडे आणि तन्वी मिठी मारून पोज देताना दिसत आहेत.

Horror Movies: OTT वर उपलब्ध आहेत बॉलीवूडचे ‘हे’ भयंकर भयपट, एकटं बसून पाहायची वाटेल भीती

हे फोटो पोस्ट करत तन्वीने लिहिलं, “तुमच्यापैकी अनेकांनी विचारलं आम्ही भेटतो का? आम्ही अजूनही संपर्कात आहोत का? आम्ही सर्वजण पुन्हा एकाच फ्रेममध्ये दिसू शकतो का? तर आम्ही तुमच्यासाठी एकत्र आलो. सेटवरील माझे आई-वडील आणि बेस्ट सहकलाकार.”

विराजस कुलकर्णीने शेअर केले फोटो

मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजसने देखील या सुंदर रियुनियनचे फोटो पोस्ट केले आहेत. ‘सोनपरी’च्या या रियुनियनला तोही आई मृणाल यांच्याबरोबर केला होता. त्याने अशोक लोखंडे, आई मृणाल व तन्वी हेगडे यांच्याबरोबर काढलेले फोटो पोस्ट केले आहेत. ‘सोनपरी’च्या रियुनियनबरोबर एक फोटो असं कॅप्शन विराजसने दिलं आहे.

Arbaz Patel Girlfriend: अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का? ती कोण आहे, काय करते? जाणून घ्या

‘सोनपरी’ व्यतिरिक्त तन्वीने ‘शाका लाका बूम बूम’, ‘हिप हिप हुर्रे’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. २०१६ मध्ये ती शेवटची मराठी चित्रपटात दिसली होती. मृणाल कुलकर्णी यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास त्या मराठीतील दिग्गज अभिनेत्री आहेत. त्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanvi hegde sonpari reunion mrunal kulkarni son virajas kulkarni shared photos hrc