‘गुम है किसी के प्यार में’ फेम टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री तन्वी ठक्कर आई झाली आहे. तिने पती व बाळाबरोबरचा फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. तन्वी व तिचा पती आदित्य कपाडिया १९ जून रोजी बाळाचे पालक झाले. तन्वीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

Video: कुरळे केस, गोल चेहरा अन्…, हा व्हिडीओ पाहून तुम्हीही विचाराल ‘ऋषी कपूर जिवंत आहेत?’

तन्वीने फोटो शेअर करत “सर्व काही इथून सुरू होते,” अशा आशयाचा हॅशटॅग शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती व तिचा पती बाळाकडे पाहताना दिसत आहेत. तन्वीने लाल रंगाच्या हार्ट इमोजीने मुलाचा चेहरा लपवला आहे. तन्वीच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटी कमेंट करून शुभेच्छा देत आहेत.

इशिता दत्ता, वत्सल सेठ, पर्ल पुरी, सचिन राजपूत, पलक सिंधवानी, किश्वर मर्चंट यांनी कमेंट करून या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया यांनी साखरपुड्यानंतर ७ वर्षांनी २०२१ मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर दोन वर्षांनी ते एका गोंडस मुलाचे पालक झाले आहेत. ‘गुम है किसी के प्यार में’ मध्ये तन्वी शिवानी बुवाची भूमिका साकारत होती. शोमध्ये लीप झाल्यानंतर तिने शो सोडला होता.