‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गेली १४ वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकरांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून मालिकेतील कलाकार मलिका सोडून जात आहे.
तारक मेहता मालिकेतून आजवर दयाबेन, अंजली भाभी, तारक मेहता, टप्पू हे पात्र साकारणारे कलाकार सोडून गेले आहेत. इतकंच नव्हे मालिकेच्या दिग्दर्शकानेदेखील मालिका सोडली आहे. आता आणखीन एका कलाकार मालिका सोडून गेल्याने प्रेक्षकांना धक्का बसला आहे. या मालिकेत बावरी पात्र साकारणारी अभिनेत्री मोनिका भदोरिया हिने मालिका सोडली आहे. मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी माहिती दिली आहे.
मालिकेत बावरी गावाला गेल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र आता बावरीची भूमिका नवीना वाडेकर दिसणार आहे. विशेष म्हणजे नव्या बावरीचे बाघाबरोबरचे फोटो व्हायरल झाले आहेत. अनेक कलाकार मालिका सोडून गेले तरी मालिकेचा प्रेक्षकवर्ग आजही मालिका आवडीने बघतो. मात्र टीआरपीच्या शर्यतीत मालिकेला संघर्ष करावा लागत आहे.