‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या मालिकेत ‘मिसेस रोशन सिंह सोढी’ ही भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले. मात्र निर्माते असित मोदी यांनी हे आरोप फेटाळून लावले. जेनिफरनंतर याच कार्यक्रमांमध्ये ‘रीटा रिपोर्टर’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया अहुजानेही निर्मात्यांच्या वागण्यावर टीका केली. तर आता तिने जेनिफरला पाठिंबा दिला आहे.

जेनिफरने या मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक टिप्पणी केल्याचे आरोप करताना या मालिकेतील काही कलाकार तिच्या बाजूने बोलले तर काहींनी तिच्यावरच टीका केली. जेनिफरने निर्मात्याविरुद्ध आवाज उठवल्यावर प्रिया अहुजाने देखील तिला आलेला वाईट अनुभव सांगितला होता. तर आता तिने जेनिफरची बाजू घेत ती सेटवर कशी वागायची, हे सांगितलं आहे.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Anti corruption department filed case against Wangani Sarpanch Vanita Adhav for demanding bribe
लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
ED quiz actress Gehena Vasisth in financial fraud probe
अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून चौकशी
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार

आणखी वाचा : “तो पुरुष असल्याने…,” ‘तारक मेहता…’ फेम मंदार चांदवडकरबद्दल जेनिफर मिस्त्रीने व्यक्त केला संताप, जाणून घ्या नेमकं काय घडलं

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत प्रिया म्हणाली, “मालिकेतील कोणीही कलाकार जेनिफरच्या बाजूने बोलले नाही हे पाहिल्यावर मी खूप थक्क झाले. कारण सेटवर तिची अनेकांशी खूप चांगली मैत्री होती. माझ्या कठीण काळात जेनिफर माझ्याबरोबर होती. मी हे नक्कीच सांगेन की ती कधीही सेटवर कोणाशीही वाईट वागायची नाही किंवा कोणालाही हीन वागणूक द्यायची नाही.”

हेही वाचा : “माझ्या गरोदरपणानंतर…,” ‘तारक मेहता…’मध्ये ‘रिटा रिपोर्टर’ साकारणाऱ्या प्रिया अहुजाचे निर्मात्यांवर गंभीर आरोप, म्हणाली…

दरम्यान, प्रिया अहुजा ही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे माजी दिग्दर्शक मालव राजदा यांची पत्नी आहे. तर मालिकेच्या सेटवर तिला अनेक मानसिक त्रासांना सामोरे जावं लागायचं असं तिने मध्यंतरी म्हटलं होतं. “कामाच्या बाबतीत निर्मात्यांनी माझ्याबरोबर अन्याय केला. मालव आणि माझं लग्न झाल्यानंतर या मालिकेतून माझा ट्रॅक कमी केला गेला. कधीही या मालिकेत काम करत असताना योग्य वागणूक मिळाली नाही,” असंही ती काही दिवसांपूर्वी म्हणाली होती.

Story img Loader