छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेप्रमाणेच त्यातील कलाकरांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. याच मालिकेतून अभिनेत्री प्रिया अहुजालाही लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील रिटा रिपोर्टरने तिला प्रसिद्धी मिळवून दिली.
प्रियाने काही दिवसांपूर्वी एका मासिकासाठी हॉट फोटोशूट केलं होतं. याचे फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले होते. बेडवरील या फोटोशूटमुळे प्रियाला ट्रोल करण्यात आलं होतं. आता अभिनेत्रीने या ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे. प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक स्टोरी शेअर केली होती. या स्टोरीमध्ये प्रियाने ट्रोलर्सला खडे बोल सुनावले आहेत.
हेही वाचा >> “इंग्रजी भाषा महत्त्वाची आहे पण…” प्रथमेश परबने केलेली पोस्ट चर्चेत
हेही वाचा >> “माझ्या लग्नात…” हार्दिक जोशीसह विवाहबंधनात अडकल्यानंतर अक्षया देवधरने शेअर केली खास पोस्ट
“तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता, यामुळे मला काहीच फरक पडत नाही. तुमच्यापैकी अनेकांनी कमेंटमध्ये माझा पती मालवलाही टॅग केलं. तुझी पत्नी कशी आहे आणि तू असे कपडे तिला कसे काय घालून देतोस, असंही अनेकांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. माझा मुलगा त्याच्या आईबद्दल काय विचार करेल आणि एक आई म्हणून मी त्याला काय शिकवण देत आहे, अशाही कमेंट केल्या आहेत”, असं तिने स्टोरीमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा >> “…तेव्हा मी १८ तास जेवण केलं नव्हतं” ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटातील ‘तो’ प्रसंग सांगताना अनुपम खेर भावूक
पुढे प्रियाने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. ती म्हणते, “मी एक पत्नी व आई म्हणून कशी आहे ते मालव व माझा मुलगा अरदास यांना ठरवू दे. मी काय घालायचं, कोणते कपडे नाही घालायचे यासाठी मला कोणाकडूनही परवानगी घ्यायची गरज नाही. माझं आयुष्य कसं जगायचं हे मी ठरवेन. तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. पण एक व्यक्ती व कुटुंबाला तुमच्या या प्रतिक्रियांची गरज नाही”.